गाव तळ्याकाठी काळा अवाक पक्षांचे थवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गाव तळ्याकाठी काळा अवाक पक्षांचे थवे
गाव तळ्याकाठी काळा अवाक पक्षांचे थवे

गाव तळ्याकाठी काळा अवाक पक्षांचे थवे

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. २४ : थंडीला सुरुवात झाल्याने गावतळ्या काठी काळाअवाक (ब्लॅक आयबिस) पक्षांचे थवे जमू लागले आहे. तळ्याकाठी सकाळी फिरावयास येणारे नागरिक या पक्षांकडे कुतूहलाने पहात आहेत. त्यामुळे तळ्याकाठी नागरिकांची व लहान मुलांची गर्दी जमू लागली आहे. या पक्षांचा रंग विटकरी काळा असून चोच तपकिरी रंगाची आणि बाकदार असते. खाद्यांवर पांढरा ठिपका असतो, डोक्यावर लाल तुरा असून हे पक्षी साधारण ६८ से.मी. आकारमानाचे असतात. नदी, तलाव व तळी आदी ठिकाणी खडकावर बसूनआपले भक्ष शोधतात. उथळ पाण्यात चोच बुडवून मासोळ्या, खेकडे, बेडूक, सरडे हे यांचे खाद्य आहे. मार्च ते नोव्हेंबर हा या पक्षाचा विणीचा काळ असून त्यांचे घरटे उंच झाडावर काटक्या व पिसे यांचा वापर करून केलेले असते मादी एकावेळी दोन ते तीन फिकट हिरव्या रंगाची व त्यावर तपकिरी ठिपके असलेली अंडी देते. तळ्याकाठी थव्याने जमलेले हे सर्व पक्षी बहुतेक वर वर्णन केलेल्या रंगाचे असून. मात्र त्यातील एक बगळ्या सारखा शुभ्र पांढऱ्या रंगाचा हा एकमेव पक्षी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे सहाजिकच कवी ग.दी. माडगूळकरांची कविता ओठावर येते. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख... होते कुरूप वेडे पिल्लू तयांत एक....

फोटो ः ६९६२