पिंपरी वर्धापनदिन लेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी वर्धापनदिन लेख
पिंपरी वर्धापनदिन लेख

पिंपरी वर्धापनदिन लेख

sakal_logo
By

स्मार्ट सिटीत
स्मार्ट वर्क

अनेक नागरिकांच्या मनात स्मार्ट सिटी बाबत वेगवेगळी मते आहेत. स्मार्ट म्हणजे केवळ आयटी किंवा मोबाईल टेक्‍नॉलॉजीचा वापर करून स्मार्ट बनवायचे असे नाही. हा एक भाग स्मार्ट सिटीचा आहे. मात्र, स्मार्ट सिटी हे व्यापक अर्थाने पाहण्याची गोष्ट आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी म्हणजे काय? हे जाणून घेतले पाहिजे. कारण स्मार्ट सिटीत अनेक स्मार्ट कामे सुरू आहेत.
- प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. नागरिकांना चांगलं जीवन जगता यावं, हा महत्त्वाचा भाग स्मार्ट सिटीचा आहे. त्यामुळे चांगल्या आयुष्यासाठी नागरिकाला काय करायला पाहिजे? या सगळ्या गोष्टी स्मार्ट सिटीनं उपलब्ध करून दिल्या पाहिजे. नोकरी वा रोजगाराची संधी असेल तिथे लोकं जात असतात. त्यामुळे ते लोकं त्या शहराला आपलंस करतात. कारण त्यांना तिथे त्यांच्या उपजिवेकेची साधने मिळतात. पण, या व्यतिरिक्त चांगलं जगण्यासाठी, चांगल्या उपजिवेकेसाठी, काम, धंद्यासाठी आठ ते दहा तास व्यग्र राहिल्यानंतर उर्वरित काळ त्याच्या कुटुंबासाठी, व्यक्तिगत जीवनासाठी, समाजासाठी तो व्यक्ती देतो. त्याचे समाजाशी संबंध असतात. या संबंधांचे दृढीकरण करून आनंददायी जीवन जगता यावं हा स्मार्ट सिटीचा दुसरा भाग आहे. या करिता नियोजनात काही आनंदवर्धक गोष्टी अंतर्भूत कराव्या लागतात. यामध्ये सार्वजनिक ठिकाणांचा विकास, गार्डन, क्रीडांगण, कला व संस्कृतीसाठी करायच्या काही गोष्टी आहेत. कला, क्रीडा संस्कृती पाहिली पाहिजे. चित्रकार, लेखक, कवी यांचा अंतर्भाव या प्रक्रियेत करावा लागतो. त्यासाठी नागरिकांशी संवाद साधणे. लोकांशी चांगले संबंध निर्माण करण्यासाठी काम करणं हा स्मार्ट सिटीचा उद्देश आहे. तिसरी गोष्ट म्हणजे टेक्‍नॉलॉजी. सगळं चांगलं करण्यासाठी नागरिकांना सुरक्षित जीवन जगता यावं, घरबसल्या सर्वसेवा देणं, कार्यालयात लांब जाणं पडू नये. मिळकत कर अथवा अन्य व्यवहार घरबसल्या करता याव्यात. शहरातं काय घडतंय, रोजच्या घडामोडी बसल्या जागी कळाव्यात. शहराची माहिती एका क्‍लिकवर मिळावी, या सगळ्या गोष्टी घडवून आणण्याचे काम स्मार्ट सिटी करते. आज सोशल मीडियाच्या वापरामुळे जग कनेक्‍ट झालेलं आहे. शहर वेगानं वाढलं आहे. नागरिकांना सुरक्षितता उपलब्ध करून देणं अत्यंत महत्त्वाचं काम आहे. तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागेल. गुन्ह्याच्या तपासासाठी, गुन्हे कमी करणं असेल, वाहतूक सुरळीत करायची असेल, मोबिलिटी मॅनेजमेंट असेल, सार्वजनिक प्रवासाची साधनं सक्षम करावी लागणार आहे. या सर्वांचा समावेश स्मार्ट सिटीत अंतर्भूत आहे.

लोकांच्या सेवेसाठी....
- पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर भागात स्मार्ट सिटी प्रकल्प राबविली जात आहे. हा पायलट प्रोजेक्‍ट आहे. या भागाचा चेहरामोहरा बदलला आहे. बदलत आहे.
- चऱ्होली, मोशी, चिखली, रावेत, किवळे, मामुर्डी, ताथवडे, पुनावळे, वाकड भागातही रस्त्यांचा विकास होत आहे. पदपथ केले जात आहेत. सायकल ट्रॅक आहे. भूमिगत जलवाहिन्या व सांडपाणी नलिका टाकल्या आहेत. गरजेनुसार रस्ते केले जात आहेत.
- नदी सुधार प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. यात पवना, इंद्रायणी, मुळा नद्यांच्या समावेश आहे.
- सुरक्षित शहरासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात आहेत. पार्किंग योजना प्रस्तावित आहे. ई-गव्हर्नसवर भर दिला आहे. फायबर ऑप्टिक केबल, वायफाय सुविधा महत्त्वाच्या ठरणाऱ्या आहेत.
- पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते फुगेवाडी दरम्यान मेट्रो सेवा सुरू झाली आहे. फुगेवाडी ते शिवाजीनगरपर्यंत ट्रॅकचे काम अंतिम टप्प्यात आहे. पिंपरीपासून निगडीपर्यंत मेट्रोचा विस्तार प्रस्तावित आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोने वाकडचा भाग जोडला जाणार आहे.
- रिंगरोडचे काम मार्गी लागले आहे. एमसीएमटीआर प्रस्तावित आहे. बीआरटीचे पाचही मार्ग कार्यान्वित केले जाणार आहे. त्यातील सेवेत सुधारणा करण्याची गरज आहे. लोकांना चांगल्या एसी ई-बस पीएमपीच्या सेवेत येत आहेत. मेट्रो स्थानकांना पीएमपीची कनेकटिव्हिटी दिली आहे. खऱ्या अर्थानं शहर स्मार्ट होत आहे.
--