अर्थसंकल्पात १० लाखांपर्यंतची कामे सूचवा; नागरिकांना आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्थसंकल्पात १० लाखांपर्यंतची
कामे सूचवा; नागरिकांना आवाहन
अर्थसंकल्पात १० लाखांपर्यंतची कामे सूचवा; नागरिकांना आवाहन

अर्थसंकल्पात १० लाखांपर्यंतची कामे सूचवा; नागरिकांना आवाहन

sakal_logo
By

पिंपरी, ता. २४ ः महापालिकेचा २०२३-२४ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्प तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये लोकांचा सहभाग असावा, यासाठी नागरिकांनी आपापल्या भागातील १० लाख रुपयांच्या खर्चापर्यंतची कामे सुचवायची आहेत. २५ डिसेंबरपर्यंत क्षेत्रीय कार्यालय समिती स्तरावरील कामे सुचवावीत, असे आवाहन प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी क्षेत्रीय कार्यालयस्तरावर बैठक घ्यावी. त्यात नागरिकांच्या सहभागाबाबत चर्चा केली जाणार आहे. नागरिकांनी सुचवलेल्या १० लाख रुपयांपर्यंतच्या प्रस्तावांची संबंधित कार्यकारी अभियंते छाननी करतील. कामांचा प्राधान्यक्रम ठरवतील. त्यांचा समावेश क्षेत्रीय कार्यालयांच्या अर्थसंकल्पात केला जाईल. कामे सूचविण्यासाठीचे अर्ज क्षेत्रीय कार्यालयांमध्ये नागरिकांसाठी मोफत उपलब्ध असतील. शिवाय, किती व कोणत्या कामांचा समावेश अर्थसंकल्पात केला आहे, याची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे. नागरिकांनी सुचविलेल्या कामांचे एकत्रीकरण करून सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून आयुक्तांकडे येतील. त्यानंतर त्यांचा समावेश मुख्य अर्थसंकल्पात होईल. शिवाय, अर्थसंकल्पात समावेश न केलेल्या अथवा समावेश करणे शक्य नसलेल्या नागरिकांच्या कामाबाबतच्या सूचनांची माहिती कारणांसह लेखा विभागाला संबंधित क्षेत्रीय कार्यालयांनी द्यायची आहे. नागरिकांसाठी www.pcmcindia.gov.in या महापालिकेच्या संकेतस्थळावरही अर्ज उपलब्ध आहेत.

नागरिकांसाठी सूचना
- दहा लाख रुपयांच्या खर्च मर्यादेची कामे सुचवावेत
- नवीन पूल, नवे रस्ते, बांधकामे, न्यायालयाने अवैध ठरवलेली कामे सुचवू नयेत
- एका कामासाठी एकच अर्ज भरावा, मात्र, एक व्यक्ती अनेक कामे सुचवू शकते