स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील प्रवेशासाठी आज शेवटची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील
प्रवेशासाठी आज शेवटची संधी
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील प्रवेशासाठी आज शेवटची संधी

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील प्रवेशासाठी आज शेवटची संधी

sakal_logo
By

पिंपरी, ता. २४ ः केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करण्यासाठी महापालिकेतर्फे सावित्रीबाई फुले ॲकॅडमी सुरू केली जात आहे. पिंपरीतील ज्ञानज्योजी सावित्रीबाई फुले स्मारक इमारतीत ॲकॅडमी असून त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशासाठी राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (एसआयएसी), भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व महापालिका संचलित सावित्रीबाई फुले ॲकॅडमी यांच्यातर्फे सामायिक प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत शुक्रवारी (ता. २५) मध्यरात्री बारा वाजेपर्यंत आहे. प्रवेश परीक्षेची अधिसूचना www.siac.org.in या संकेतस्थळावर दिली आहे. रविवार, ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत लेखी परीक्षा होईल. त्यानंतर मुलाखती घेतल्या जातील. त्याबाबतचे वेळापत्रक लेखी परीक्षेनंतर जाहीर केली जाईल, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी कळविले आहे.