सिझन्स बँकेट हॉल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिझन्स बँकेट हॉल
सिझन्स बँकेट हॉल

सिझन्स बँकेट हॉल

sakal_logo
By

लग्नाच्या सर्व सुविधांसाठी सिझेन्स बँकेट
--------------------------------------

लीड
------
मंगल कार्यालयांमध्ये होणारे लग्न सोहळे आता कालबाह्य होत आहेत. या मंगल कार्यालयांची जागा आता बँकेट हॉल घेत आहेत. मंगल कार्यालय आणि बँकेट हॉल या दोन्हीतील फरक हा समाजाने उंचावलेला राहणीमानाचा दर्जा दर्शवितो. लोकांची बदललेली अभिरुची लक्षात घेऊन, शहरात बँकेट हॉल उभारले जात आहेत. मात्र, चिखली येथील सिझन्स बँकेट हॉलने आपल्या विविध वैशिष्ट्यांमुळे लोकांच्या मनात घर केले आहे.
-------------------------------------------------

सिझन्स बँकेट हॉलच्या चिखलीसह आकुर्डी, यमुनानगर, वाघोली येथेही शाखा आहेत. याबाबत त्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले, की पूर्वी फक्त पंचतारांकित हॉटेलमध्ये बँकेट हॉल असत. २०१७ मध्ये एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त टीम मधील एक सदस्य स्वतंत्र बँकेट हॉलच्या शोधात होते. पण त्यांना मध्यमवर्गीय कुटुंबाला परवडेल आणि आरामदायी आणि सुंदर असा हॉल रास्त दरात ते शहरात कोठेही उपलब्ध झाला नाही. त्यामुळे समाजाची नेमकी गरज ‘टीम सिझेन्स’ ने ओळखली. आपली जशी गैरसोय झाली, तशी आणखी कोणाची होऊ नये, यासाठी त्यांनी २०१८ मध्ये प्रथम आकुर्डी येथे हॉल सुरु केला. त्याला पहिल्या दिवसापासून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभू लागला. त्यामुळे या प्रतिसादाने ‘टीम सिझेन्स’चा उत्साह वाढला. त्यांनी लगेचच यमुनानगर- निगडी येथे २०२० मध्ये तर मे २०२२ मध्ये पुण्यातील वाघोली येथेही शाखा सुरु केल्या.

सिझन्स बँकेटची ध्येय-धोरणे:
नावीन्यपूर्ण पद्धतीने ग्राहकांची सेवा करून, त्याद्वारे या सेवा क्षेत्रात नवीन पाया रचणे आणि ग्राहकांच्या आयुष्यातील क्षण हे त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग ठरतील, अशा पद्धतीची सेवा देणे, ही सिझन्सची भूमिका आहे. तसेच ग्राहकांच्या आयुष्यातील विशेष क्षण अत्यंत आरामदायी पद्धतीने माफक दरात साजरे करण्याची सुविधा देण्यासाठी ‘सिझन्स’ कटिबद्ध आहे. केवळ ग्राहकांसाठीच नाही तर कर्मचाऱ्यांच्या आयुष्यातही आनंद आणि आरामदायीपणा आणण्यासाठी ‘सिझन्स’ उत्तरदायी आहे. त्यासाठी सेवेविषयी असलेली एकाग्रता आणि प्रामाणिकता ही त्यांची मौलिक संपत्ती आहे. तसेच येथे होणारा प्रत्येक कार्यक्रम हा यशस्वी होण्यासाठी ‘सिझन्स’ची संपूर्ण टीम ही सातत्याने कार्यरत असते.

सिझन्स बँकेट हॉलच का?

सिझन्स बँकेट हॉल सुमारे दीड एकर परिसरात (सुमारे ६० हजार चौरस फूट) विस्तारलेले आहे. येथे सुमारे १७५ वाहनांच्या पार्किंगची प्रशस्त सुविधा आहे. या हॉलच्या आवारातच ३४ वातानुकूलित (एसी) खोल्या आहेत. तेथे सुमारे १०० जणांच्या राहण्याची व्यवस्था आहे. तसेच परिसरातील चार हॉटेल्सशीही ‘सिझन्स’ने टाय-अप केले आहे. तेथेही ३०० ते ४०० जणांच्या राहण्याची व्यवस्था होऊ शकते. त्यामुळे डेस्टिनेशन वेडिंगसाठीही हा हॉल एक उत्तम पर्याय होऊ शकतो.
पिंपरी-चिंचवडमधील चिखली येथील हा सर्वात मोठा वातानुकूलित (एसी) बँकेट हॉल आहे. या हॉलमध्ये पंचतारांकित हॉटेलमध्ये काम केलेले अनुभवी शेफ आहेत. त्यामुळे येथील जेवण अत्यंत चविष्ट असते. तसेच या शेफमुळे या चवीत सातत्यही राखले जाते.
अनेक बँकेट हॉलमध्येच जेवणाची व्यवस्था असते. तसे येथे नाही. जेवणासाठी जवळपास ६,००० चौरस फुटांचा स्वतंत्र प्रशस्त आणि हवेशीर हॉल आहे. त्यामुळे कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांना जेवणाचा निवांत आस्वाद घेता येतो. डायनिंग एरियामध्ये दोन मेन कोर्स, दोन सूप स्टेशन्स, दोन डेझर्ट काउंटर असे विभाग आहेत. त्यामुळे एकाच वेळी जरी दोन कार्यक्रम असले तरी काही अडचण येत नाही. दोन्ही कार्यक्रमांना येणारे पाहुणे आपापल्या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेऊ शकतात.

सिझन्स बँकेट हॉलची वैशिष्ट्ये :
चिखली येथील सिझन्स बँकेट हॉल हा सुमारे नऊ हजार चौरस फुटांचा आहे. मात्र गरजेनुसार एकाच वेळी दोन कार्यक्रम करण्याचीही येथे सुविधा आहे. त्यासाठी एका पार्टीशनद्वारे याचे दोन हॉलमध्ये
रूपांतर करता येते. त्यामुळे एक हॉल ३५०० चौरस फुटांचा तर दुसरा ५५०० चौरस फुटांचा होतो. यांची बैठक व्यवस्था अनुक्रमे ३०० आणि ५०० जणांची होते. तसेच राऊंड टेबल सेट अपही अनुक्रमे १५० आणि २५० जणांसाठी आहे. हॉल अखंड केल्यास त्यामध्ये ११०० जण बसू शकतात. मोठ्या लग्न समारंभांना अनेकजण ऐनवेळी येतात. त्यामुळे असे ४०० जण एकावेळी येथे उभे राहू शकतात. त्यामुळे १५०० पाहुण्यांची व्यवस्था होऊ शकते. परिणामी अगदी १५० पासून १५०० जणांपर्यंतच्या लग्न आणि कॉर्पोरेट कार्यक्रमांसाठी हा हॉल एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

चिखलीचा हॉल कोणत्या ग्राहकांसाठी ? :
राजगुरूनगर ते भोसरी या दरम्यान एवढ्या क्षमतेचा एकही चांगला वातानुकूलित (एसी) बँकेट हॉल नाही. त्यामुळेच या चिखली परिसरात हा हॉल उभारण्यात आला. या परिसरातील नागरिकांना लग्न किंवा अन्य काही कार्यक्रमासाठी या हॉलची उपयुक्तता अधिक आहे. तसेच तेथे ये - जा करण्यासाठीही (कनेक्टिव्हिटी) अधिक सुविधाजनक आहे. तसेच आळंदीसह तळवडे ते चऱ्होलीपर्यंतच्या नागरिकांसाठी हा हॉल एक उत्तम पर्याय ठरू शकतो. हा हॉल सुरु होऊन केवळ दीड महिनाच झाला आहे. मात्र ग्राहकांचा प्रतिसाद चांगला लाभत असल्याचे ‘टीम सिझेन्स’ यांनी सांगितले.

वास्तुकलेचा उत्तम नमुना :
रोमन वास्तू शिल्पांचा सखोल अभ्यास करून, हा हॉल बांधलेला आहे. हॉलच्या उंचीला अनुरूप ठरेल इतकीच खांबांची जाडी आहे. रोमन शैलीतील कलाकारीही येथे पाहावयास मिळते. या हॉलमध्ये प्रवेश करतानाच आपण बँकेट हॉलऐवजी एखाद्या भव्य रोमन शैलीतील वास्तूत प्रवेश करतो आहोत की काय, असा भास होतो. त्यामुळे अत्यंत अभिरुचीसंपन्न असा हा हॉल वाटतो. भव्य दरवाजे त्यांचे कोयंडे सर्वच अतिशय सुंदर आणि आकर्षक आहेत. त्यामुळे हा हॉल रोमन वास्तूकलेचा एक उत्तम नमुना आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. हॉलमधील खुर्च्याही अगदी आरामदायी आहेत. तेथे कितीही वेळ बसले तरी थकल्यासारखे वाटत नाही. या खुर्च्यांवर स्वच्छ कव्हर घातलेली असतात.

‘सिझन्स’च्या इतर हॉलविषयी ः
आकुर्डीतील तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर दोन हॉल आहेत. पार्टीशनद्वारे या दोन हॉलचे चार हॉलमध्ये रूपांतर करता येऊ शकते. या दोन्ही हॉलसाठी अनुक्रमे २४०० आणि २५०० चौरस फुटांचे डायनिंग एरिया आहेत. आकुर्डीच्या या शाखेची क्षमता ५० ते १,००० जणांसाठीच्या कार्यक्रमांसाठी आहे. यमुनानगर शाखेत दोन लॉनची व्यवस्था आहे. पिंपरी-चिंचवडमधील सर्वात मोठा सुमारे ६०,००० चौरस फुटांचा लॉनची येथे सुविधा आहे. तसेच या व्यतिरिक्त छोट्या कार्यक्रमांसाठी २०,००० चौरस फुटांचा स्वतंत्र लॉन आहे. या लॉनची क्षमता ३०० लोकांपासून ३,००० लोकांसाठी आहे. या शाखेत दोन वातानुकूलित (एसी) बँकेट हॉलही आहेत. दोन्ही हॉल ग्राउंड फ्लोअरलाच आहेत. या दोन्ही हॉलचे मिळून ८००० चौरस फूट क्षेत्रफळ आहे. तसेच एका हॉलसाठी ३६०० चौरस फुटाचे तर दुसऱ्या हॉलसाठी २५०० चौरस फुटाचे असे मिळून ६००० चौरस फुटांचे डायनिंग एरिया आहे. या बँकेट हॉलची क्षमता १५० लोकांपासून १००० लोकांसाठी आहे.

‘सिझन्स’चे मेनू :
‘सिझन्स’मध्ये ‘सिल्वर’, ‘गोल्ड’ आणि ‘डायमंड’ असे तीन मेनू आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या बजेटनुसार मेनू निवडण्यास चांगला वाव मिळतो. या मेनूमध्ये वेलकम ड्रिंक, स्टार्टर्स, सूप, सलाड. रायता, पनीर मेन कोर्स असे विविध पदार्थ असतात. या व्यतिरिक्त इतर नेहमीचे पदार्थ असतात. पंजाबी, उत्तर भारतीय पदार्थांसह, चायनीज, कॉन्टिनेन्टलसह पारंपरिक महाराष्ट्रीयन जेवणाचेही अनेक चविष्ट पदार्थ ग्राहकांना निवडता येतात. ‘टीम सिझेन्स’च्या सर्व शाखांमधील सर्व मिठाई ही शुद्ध देशी तुपात तयार केली जाते. तसेच सर्व जेवण हे जेमिनी रिफाईंड ऑईलमध्येच तयार केले जाते.

चौकट
- अद्ययावत, सुसज्ज बँकेट हॉल

पिंपरी-चिंचवडमधील सिझेन्स बँकेट हा अद्ययावत आणि सुसज्ज बँकेट हॉल आहे. येथे जेवणासाठीच्या सर्व भाज्या अद्ययावत मशीनद्वारे चिरल्या जातात. तसेच गुलाबजामचे गोळे, फुलके यंत्राद्वारे तयार केले जातात. त्यामुळे त्याच्या दर्जात सातत्य राहते.

यबँकेट हॉलची प्रमुख वैशिष्ट्ये ...
* आरामदायी वातावरण
* रुचकर जेवण
* उत्तम सेवा