स्वातंत्र्यसमर महानाट्याचे एक डिसेंबरपासून प्रयोग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वातंत्र्यसमर महानाट्याचे 
एक डिसेंबरपासून प्रयोग
स्वातंत्र्यसमर महानाट्याचे एक डिसेंबरपासून प्रयोग

स्वातंत्र्यसमर महानाट्याचे एक डिसेंबरपासून प्रयोग

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. २४ : ॲड. पु. वा. परांजपे विद्यामंदिराचे अमृत महोत्सवी वर्ष आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठान आयोजित हिंदुस्थानच्या सशस्त्र क्रांतीचा ९५० वर्षाचा इतिहास मांडणारे ऐतिहासिक महानाट्य स्वातंत्र्यसमर या महानाट्याचे प्रयोग १ ते ४ डिसेंबरला होणार आहेत. ८१२ विद्यार्थ्यांना विनामूल्य तिकीट वितरणाचा कार्यक्रम शाळेमध्ये संपन्न झाला.

शालेय विद्यार्थ्यांसाठी ही अनमोल संधी उपलब्ध करून देणारे शाळेचे माजी विद्यार्थी व शालेय समिती सदस्य, उद्योजक अशोक काळोखे व त्यांच्या पत्नी नगरसेविका नीता काळोखे शालेय समिती अध्यक्ष तसेच नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचे सहसचिव नंदकुमार शेलार, मुख्याध्यापक पांडुरंग पोटे, पर्यवेक्षक पांडुरंग कापरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.

याप्रसंगी अशोक काळोखे यांनी मनोगतमध्ये महानाट्य तिकीट वितरण कार्यक्रमाची सुरुवात मी माझ्या शाळेपासून करीत आहे. या नाट्याद्वारे भारतीय स्वातंत्र्याचा अजरामर इतिहास आपल्यासमोर सादर केला जाणार आहे. तो सर्व विद्यार्थ्यांनी पहावा व या संधीचा लाभ घ्यावा असे सांगितले. नंदकुमार शेलार यांनी आपल्या मनोगतात काळोखे हे आपल्या शाळेचे विद्यार्थी असून शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी शाळेमध्ये ते विविध उपक्रम राबवत असतात तसेच या शुभकार्याची सुरुवात त्यांनी आपल्या शाळेपासून केली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. प्रतिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना तिकीट वितरण शालेय प्रांगणात करण्यात आले. शाळेचे सर्व शिक्षक, कर्मचारी यांना देखील विनामूल्य तिकीट देण्यात येणार आहे. शाळेच्या वतीने उभय दांपत्याचा शाल व तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक पांडुरंग कापरे यांनी केले. आभार शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे यांनी मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता नागपुरे व वैशाली कोयते यांनी केले.

PNE22T07006
tas-२४-११-२२-P१