सफाई कर्मचाऱ्यांचा भोसरीत सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सफाई कर्मचाऱ्यांचा भोसरीत सन्मान
सफाई कर्मचाऱ्यांचा भोसरीत सन्मान

सफाई कर्मचाऱ्यांचा भोसरीत सन्मान

sakal_logo
By

पिंपरी, ता. २४ ः स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात महापालिकेच्या इ आणि फ क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रातील सफाई कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. उपआयुक्त अजय चारठाणकर, क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे, स्वच्छ भारत अभियानाचे समन्वयक विनोद जळक, सहायक आरोग्याधिकारी राजेश भाट, मुख्य आरोग्य निरीक्षक एस. एस. गायकवाड, आरोग्य निरीक्षक एस. बी. चन्नाल, उद्धव डवरी, शैलेंद्र तवर, भूषण शिंदे, योगेश फल्ले, राकेश सोदरी आदी उपस्थित होते. ऑक्टोबर महिन्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना सन्मानित केले. प्रातिनिधिक स्वरूपात पीपीई किटचे वाटप केले. सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्रियांका कापोरे यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी मोफत रोजगाराभिमुख शिक्षण आणि कोर्सबद्दल माहिती दिली. सिद्धेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत व ‘झिरो वेस्ट’ कविता सादर केली. सूत्रसंचालन पौर्णिमा भोर यांनी केले.