वायसीएममध्ये १० रुपयांत किडनी, मधुमेह तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वायसीएममध्ये १० रुपयांत
किडनी, मधुमेह तपासणी
वायसीएममध्ये १० रुपयांत किडनी, मधुमेह तपासणी

वायसीएममध्ये १० रुपयांत किडनी, मधुमेह तपासणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. २४ ः महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) मेडीसीन विभागात स्पेशालिटी क्लिनिक सुरू केले आहे. त्यात किडनीचे आजार, मधुमेह, पक्षघात व मज्जातंतू संदर्भातील आजारांवर अत्यंत माफक दरात अर्थात १० रुपयात तपासणी होणार आहे, अशी माहिती वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली. क्लिनिकच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मेडीसीन विभागप्रमुख डॉ. प्रवीण सोनी, सहयोगी प्राध्यापक डॉ. निरंजन पाठक, डॉ. नरेंद्र काळे व आदी उपस्थित होते.