मिळकतकर थकबाकी; ५० सदनिका सील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिळकतकर थकबाकी;
५० सदनिका सील
मिळकतकर थकबाकी; ५० सदनिका सील

मिळकतकर थकबाकी; ५० सदनिका सील

sakal_logo
By

पिंपरी, ता. २४ ः महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने थकबाकीदारांच्या सोसायट्यांमधील तब्बल ५० सदनिका एकाच दिवशी सील केल्या. सदनिकाधारकांकडे ५५ लाखांची थकबाकी आहे, अशी माहिती सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली. कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी थकीत कर भरून महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. शहरातील तीन लाख निवासी मालमत्ताधारकांकडे त५८३ कोटी रुपयांची थकबाकी आहे. वारंवार आवाहन करूनही कर न भरल्याने पिंपरीतील ॲथिया, रावेतमधील पंचवटी, रेनबो, प्रोबो, वाकडमधील मॉन्ट व्हर्ट सेविल, पुनावळेतील सियोना, पिंपळे-सौदागर येथील शुभश्री वुड्स, लाईफ स्टाईल, चिंचवड येथील माइंड्स्पेस रिआलिटी क्कीन्स टाऊन, तळवडेतील देवी इंद्रायणी या सोसायट्यांतील सदनिका सील केल्या. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार आहे. तसेच, जप्तीनंतरही कर न भरल्यास जप्त केलेल्या साहित्याचा लिलाव केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.