पिंपरी वर्धापनदिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी वर्धापनदिन
पिंपरी वर्धापनदिन

पिंपरी वर्धापनदिन

sakal_logo
By

स्मार्ट सिटीमुळे
गावांचा बदलतोय चेहरा

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर परिसरात कामे सुरू आहेत. दोन्ही उपनगरांचा चेहरा-मोहरा बदलत आहे. २१ किलोमीटर अंतराचे रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. विविध प्रकल्प राबविले जात आहेत.
- प्रतिनिधी


केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने स्मार्ट सिटी योजना २५ जून २०१५ रोजी घोषित केली. त्यामध्ये दोन वर्षांनी पिंपरी-चिंचवडचा समावेश झाला. १३ जुलै २०१७ रोजी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनी स्थापन केली. तेव्हापासून केंद्र व राज्य सरकार आणि महापालिका निधी उपलब्ध करून देत आहे. कामे सुरू असून शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे सुरू आहे. महापालिकेने तयार केलेल्या एरिया बेसड् डेव्हलपमेंट (एबीडी) आणि पॅन सिटी सोल्युशन या दोन स्थरांवर कामे सुरू आहेत. एबीडीमध्ये सोलर पॉवर जनरेशन, बायसिकल शेअरिंग, पदपाथांसह स्मार्ट रोड, सायकल जंक्शन डिझाईन, स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज, सेव्हर नेटवर्क, टु पार्क अँड पब्लिक टॉयलेटस (स्ट्रीट टॉयलेट सह) आणि पॅन सिटीमध्ये सिटी नेटवर्क, सिटी वायफाय, म्युनिसिपल ई-क्लासरुम, स्मार्ट किओक्स आणि व्हीएमडी सोल्युशन, सीसीटीव्ही, सर्व्हेलन्स, स्मार्ट ट्राफीक, स्मार्ट वॉटर ॲन्ड सेव्हरेज, स्मार्ट पार्किंग, सिलेक्शन ऑफ सिस्टिम इंटेग्रेटर फॉर इंटेग्रेटेड जीआयएस एनेबल इआरपी सोल्युशन्स, स्टार्टअप इन्क्यूबेशन सेंटर या प्रकल्पांचा समावेश आहे.

सौरऊर्जा
स्मार्ट सिटीने जलशुद्धीकरण केंद्र सेक्टर २३ निगडी, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पिंपरी या ठिकाणी रूफटॉप सोलर पॉवर प्रोजेक्टची उभारणी केली आहे. तसेच, सोलर पॅनेल बसवण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र, रुग्णालये, शाळा, नाट्यगृहे इत्यादींची निवड झाली आहे.

स्टार्ट अप
नवउद्योजक आणि स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी इनक्युबेशन सेंटरची स्थापना केली आहे. ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिग, बायो फार्मा, माहिती तंत्रज्ञान, सेवा या क्षेत्रांमध्ये नवनिर्मिती, सहयोग आणि उद्योजकता यांना प्रोत्साहन देणे हे इनक्युबेशन सेंटरचे मुख्य उद्दिष्ट्ये आहे.

स्किल डेव्हलपमेंट
शहरातील विद्यार्थ्यांना रोजगाराक्षम अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी स्किल डेव्हलपमेंट उपक्रम सुरू केला आहे. यात चार अभ्यासक्रमांचा समावेश आहे. कार्यक्षम मनुष्यबळ निर्माण करणे, जागतिक स्तरावर रोजगाराभिमुख व कौशल्यावर आधारित मॉडयूल तयार करणे, हा प्रमुख उद्देश आहे.

सिटी नेटवर्क
स्मार्ट सिटी फायबर ऑप्टिक्स नेटवर्क सिस्टीम हे स्मार्ट सिटीच्या पायाभूत सुविधांमधील अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे. सीसीटीव्ही, किऑक्स या घटकांना परस्परांशी जोडण्यासाठी आणि अद्ययावत व योग्य कृतीसाठी आवश्यक असणाऱ्या माहितीचा पुरवठा करण्यात फायबर ऑप्टिक्स नेटवर्क सिस्टीमची भूमिका आहे.

स्मार्ट किऑक्स
स्मार्ट किऑस्क हे एटीएम सारखे यंत्र आहे. ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाही त्यांच्यासाठी किऑस्क फायदेशीर आहे. त्याद्वारे तक्रार करता येते. ऑनलाईन मिळकत कर भरणा, पाणीपट्टी भरणा अशा सेवांचा लाभ घेऊ शकतात. शहरामध्ये ५० ठिकाणी स्मार्ट किओक्स मशिन्स लावल्या आहेत.

स्मार्ट पार्किंग
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील मोकळी जागा आणि वाहनतळ यांचे योग्यप्रकारे व्यवस्थापन झाले पाहिजे. यासाठी स्मार्ट पार्किंग सिस्टीम आहे. यासाठी १० ठिकाणांची निवड केली आहे. पाच ठिकाणी सेन्सॉर आणि गेटवे इन्स्टॉल केले आहेत. स्मार्ट पार्किंगमुळे नागरिकांची वेळेची बचत होणार आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे
स्मार्ट सिटी अंतर्गत शहरामध्ये ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. एक हजारावर कॅमेरे बसविले आहेत. अजूनही काम सुरू आहे. १२५२ कॅमेरे फिक्स्ड, पीटीझेड आणि डोम अंतर्गत बसवले जात आहेत. १७४ इनडोअर व १९४ आऊट डोअर असे २५८ ठिकाणी कॅमेरे बसविले आहेत.

स्मार्ट ट्रॅफिक
पोलिस आयुक्तालयाच्या मागणीनुसार शहरात ६५१ ट्रॅफिक कॅमेरे (एएनपीआर आणि आरएलव्हीडी) बसविण्यात येत आहेत. निगडी येथे स्थापन केलेल्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या (आयसीसीसी) माध्यमातून पोलिस आयुक्तालयासाठी समर्पित कमांड अँड कंट्रोल सेंटर (सीसीसी) समाविष्ट आहे.

इ-क्लासरुम प्रकल्प
म्युन्सिपल इ-क्लासरुम उपक्रम महापालिकेच्या सर्व १२३ शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. संगणक कक्ष, डिजीटल ई-लर्निग प्लॅटफॉर्म, वायफाय एक्सेस पॉईंट, एलईडी डिस्प्ले, एचडी कॅमेरा, व्हिडिओ रेकॉर्डिंग, शैक्षणिक विश्लेषण सॉफ्टवेअर, रोबोटिक्स लॅब असेल. एलइडी डिस्प्ले, कॅम्प्युटर कॅमेरे बसविले आहेत.

स्मार्ट टॉयलेट
पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर याठिकाणी एकूण १० स्मार्ट टॉयलेट उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी दोन्ही ठिकाणी चार स्मार्ट टॉयलेटचे काम प्रगतीपथावर असून संपूर्ण १० ठिकाणी लवकरच काम पूर्ण करण्यात येणार आहे.

अन्य कामे
स्मार्ट रस्त्यांना जोडणाऱ्या ४१ जंक्शनचे काम पूर्ण करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर, स्ट्रॉम वॉटर ड्रेनेज सेव्हरेज लाईन आणि वॉटर सप्लाय लाईन, रस्त्यांच्या कडेला इलेक्ट्रीक पोल, रस्त्यांच्या कडेला विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड, रस्त्यांच्या कडेला लहान गार्डन, उद्यानांचा विकास, पार्किंग सुविधा आदी कामांचा या प्रकल्पात समावेश आहे.

सिटी नेटवर्क
स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत शहरामध्ये ५८५ किलोमीटर अंतराचे ऑप्टिक फायबर नेटवर्कचे जाळे टाकण्यात येत आहे. खासगी कंपन्यांना केबल टाकण्यास मनाई करून सिटी नेटवर्कच्या माध्यमातून सदर कंपन्यांची यंत्रंणा जोडली जाणार आहे. रस्ते खोदाईचा त्रास कमी होणार आहे.
---