अवैध धंदे रोखण्यात अपयशी ठरल्याने चार पोलिस निलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवैध धंदे रोखण्यात अपयशी ठरल्याने चार पोलिस निलंबित
अवैध धंदे रोखण्यात अपयशी ठरल्याने चार पोलिस निलंबित

अवैध धंदे रोखण्यात अपयशी ठरल्याने चार पोलिस निलंबित

sakal_logo
By

अवैध धंद्याप्रकरणी
चार पोलिस निलंबित
पिंपरी, ता. २४ : हद्दीतील अवैध धंदे रोखण्यात अपयशी ठरल्याने निगडी पोलिस ठाण्यातील चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी निलंबनाचे आदेश काढले. पोलिस हवालदार सतीश जालिंदर ढोले, विलास सोमनाथ केकाण, पोलिस नाईक राहुल विठ्ठल मिसाळ, पोलिस शिपाई नितीन बिभीषण सपकाळ अशी निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली १५ नोव्हेंबरला निगडी, वाकड व देहुरोड ठाण्याच्या हद्दीत आठ ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापा टाकण्यात आला. त्यानंतर लगेचच दोन दिवसांनी पोलिस आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारत संबंधित पोलिस ठाण्यांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या. दरम्यान, याबाबत आयुक्तांनी निगडी पोलिस ठाण्याकडून अहवालही मागवला होता. त्यामध्ये त्यांच्या हद्दीतील अवैध धंदे रोखण्यात या चार कर्मचाऱ्यां‍यांना अपयश आल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी चौघांना निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत.