नागरिकांनी जाणून घेतला चिंचवड गावचा इतिहास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागरिकांनी जाणून घेतला 
चिंचवड गावचा इतिहास
नागरिकांनी जाणून घेतला चिंचवड गावचा इतिहास

नागरिकांनी जाणून घेतला चिंचवड गावचा इतिहास

sakal_logo
By

पिंपरी, ता. २५ ः जागतिक वारसा सप्ताह आणि देवदीपावलीचे औचित्य साधून इतिहासप्रेमी तरुण मंडळाने चिंचवडमध्ये हेरिटेज वॉक अर्थात वारसा फेरीचे आयोजन केले होते. ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले यांनी मोरया गोसावी मंदिर, चापेकर वाडा, मंगलमूर्ती वाडा या स्थळांची माहिती दिली. चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देवमहाराज, महाराष्ट्र साहित्य परिषद कार्यवाह प्रा. माधव राजगुरू, ज्येष्ठ साहित्यिक शोभा जोशी, प्रदीप गांधलीकर, शिरीष पडवळ, सुभाष चव्हाण, इतिहासप्रेमी तरुण मंडळाचे अध्यक्ष पद्मेश कुलकर्णी यांच्यासह इतिहासप्रेमी नागरिक सहभागी झाले होते.
चौगुले म्हणाले, ‘‘शंभर वर्षांपासून जास्त काळ अस्तित्वात असलेल्या प्राचीन स्थळांचा ऐतिहासिक वारसा म्हणून समावेश होतो. महासाधू मोरया गोसावी व त्यांच्या पिढीतील आठ सत्पुरुषांच्या समाधिस्थळांचा समूह; देशासाठी तीन भावंडांचे हौतात्म्य व चापेकर बंधूंच्या वाड्याचे पुनरुज्जीवन; पेशवेकालीन वास्तुशैलीतील मंगलमूर्ती वाडा, या स्थळांमुळे इतिहासात चिंचवडचे स्थान अबाधित आहे.’’ मंगलमूर्ती वाड्यात दीपोत्सव साजरा करून वारसा फेरीचा समारोप झाला.