जुनी सांगवीत बुधवारपासून संगीत महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुनी सांगवीत बुधवारपासून संगीत महोत्सव
जुनी सांगवीत बुधवारपासून संगीत महोत्सव

जुनी सांगवीत बुधवारपासून संगीत महोत्सव

sakal_logo
By

पिंपरी, ता. २५ ः श्रीदत्त जयंतीनिमित्त जुनी सांगवीतील श्रीदत्त आश्रमात बुधवारपासून (ता.३०) बुधवारपर्यंत (ता.७ डिसेंबर) संगीत महोत्सव व नामसप्ताहाचे आयोजन केले आहे. त्यात चारुदत्त आफळे, संपदा मांडके, मंजिरी आलेगावकर यांचे शास्रीय गायन, स्वप्ना दातार यांचे व्हायोलिन वादन व पंडित केशवराव गिंडे यांचे बासरी वादन होईल. नवोदित कलाकारांनाही गायन व वादनाची संधी मिळणार आहे. सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. जुनी सांगवीत मुळा-पवना नदी संगमाजवळील ममतानगर येथील श्रीदत्त आश्रमात सर्व कार्यक्रम होतील. महोत्सव काळात दररोज सकाळी ७ ते १० या वेळेत गुरुचरित्र पारायण होईल. दुपारी एक ते सायंकाळी पाच या वेळेत महिला मंडळांची भजनसेवा होईल.

महोत्सवातील कार्यक्रम
बुधवार, ता. ३०ः भजन - दुपारी १ ः सिद्धकला भजनी मंडळ. दुपारी ३ ः भवानीमाता महिला भजनी मंडळ. महोत्सवाचे उद्घघाटन सायंकाळी ६.३० ः हस्ते राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे. सायंकाळी ७ ः शास्रीय गायन ः आफळे व रात्री ८ ः गौरी पाटील.

गुरुवार, ता. १ ः भजन ः दुपारी १ ः संत तुकाराम भजनी मंडळ. दुपारी ३ ः अवधुत बालयोगी भजनी मंडळ. शास्रीय गायन ः सायंकाळी ६ ः सुनीता टिंगरे. रात्री ८ ः शाश्वती चैतन्य- चव्हाण.

शुक्रवार, ता. २ ः भजन ः दुपारी १ ः दुर्गादेवी महिला भजनी मंडळ. दुपारी ३ ः अवधूत बालयोगी भजनी मंडळ. बासरी वादन ः सायंकाळी ६ ः पं. केशवराव गिंडे. शास्रीय गायन ः रात्री ८ ः बाबुराव बोरगावकर व मधुवंती बोरगावकर.

शनिवार, ता. ३ ः श्रीमद्भगवतगीता सामूहिक पठण ः दुपारी १ ः आश्रमातील साधक. दुपारी ४ ः गीता जयंतीनिमित्त प्रवचन. तबला वादन ः सायंकाळी ६ ः समीर सूर्यवंशी. शास्रीय गायन ः मीनल अग्निहोत्री. रात्री ८ ः संपदा मांडके-विपट

रविवार, ता. ४ ः भजन ः दुपारी १ ः श्रीसाई सरगम वाद्यवृंद, मुंबई. शास्रीय गायन ः सायंकाळी ६ ः निवृत्तिमहाराज धाबेकर. रात्री ८ ः रामेश्वर डांगे.

सोमवार, ता. ५ ः भजन ः दुपारी १ ः माऊली भजनी मंडळ. दुपारी ३ ः साईलीला भजनमाला. शास्रीय गायन ः सायंकाळी ६ ः स्वानंदी नाईक. रात्री ८ ः रमाकांत गायकवाड.

मंगळवार, ता. ६ ः भजन ः दुपारी १ ः ज्ञानाई भजनी मंडळ. दुपारी ३ ः विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ. शास्रीय गायन ः सायंकाळी ६ ः मंजिरी आलेगावकर.

बुधवार, ता. ७ ः श्रीदत्तगुरू पादुका अभिषेक ः सकाळी ८. महादेव तुपे यांचे सनई वादन आणि जयंत नगरकर यांचे चौघडा वादन ः सकाळी ९. श्रीदत्त जन्मोत्सव कीर्तन ः सकाळी १० ः हभप माधवमहाराज इंगोले. उपस्थिती शांतिब्रह्म मारुतीमहाराज कुऱ्हेकर, वारकरी शिक्षण संस्था आळंदी. दुपारी १२ ः श्रीदत्त जन्मोत्सव पुष्पवृष्टी. दुपारी १ ः शास्रीय गायन ः पं. राजकुमार बार्शीकर. दुपारी ३ ः श्रीदत्तगुरू अखंड नामसंकीर्तन. सायंकाळी ५ ः आरती. सायंकाळी ६ ः व्हायोलिन वादन ः स्वप्ना दातार. महोत्सव समारोप ः रात्री ८ ः उपस्थिती ः हभप संदीपमहाराज व डॉ. नरेंद्रहरी सहस्रबुद्धे.
----