इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी उद्या भोसरीत ‘सायक्लोथॉन’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी उद्या भोसरीत ‘सायक्लोथॉन’
इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी उद्या भोसरीत ‘सायक्लोथॉन’

इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी उद्या भोसरीत ‘सायक्लोथॉन’

sakal_logo
By

पिंपरी, ता. २५ ः इंद्रायणी नदी स्वच्छता जनजागृती मोहिमेअंतर्गत आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून रिव्हर सायक्लोथॉन’ रॅलीचे आयोजन केले आहे. तिचे उद्‍घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवारी (ता. २७) सकाळी सहा वाजता भोसरीतील गावजत्रा मैदानावर होईल, अशी माहिती कामगार नेते सचिन लांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘रिसायकल-रिड्युस-रियुज’ असा सायक्लोथॉनचा विषय आहे. अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड सायकलपटू प्रीती म्हस्के सहभागी होतील. पाच, १५ व २५ किलोमीटर अंतर अशा तीन प्रकारात सायक्लोथॉन होईल. पाच किलोमीटर अंतर लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. गावजत्रा मैदान, इंद्रायणीनगर, शांतिनगर असा मार्ग असले. १५ किलोमीटर अंतरासाठी जय गणेश साम्राज्य, क्रांती चौक, स्पाईन सिटी चौक, गवळीमाथा, गावजत्रा मैदान असा मार्ग आहे. २५ किलोमीटर अंतरासाठी जय गणेश साम्राज्य, क्रांती चौक, कृष्णानगर, स्पाईन सिटी चौक, गवळीमाथा, गावजत्रा मैदान असा मार्ग आहे. यानिमित्त महापालिका व खासगी शाळांमध्ये चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांना सायक्लोथॉनमध्ये सन्मानित केले जाणार आहे.