भोसरी परिसरातील वाहतुकीत बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोसरी परिसरातील वाहतुकीत बदल
भोसरी परिसरातील वाहतुकीत बदल

भोसरी परिसरातील वाहतुकीत बदल

sakal_logo
By

पिंपरी, ता. २५ : इंद्रायणी स्वच्छता अभियानांतर्गत रिव्हर सायक्लोथॉन रॅलीचे रविवारी (ता. २७) भोसरीत आयोजन केले आहे. भोसरीसह स्पाईन रोड, चिखली, त्रिवेणीनगर आदी मार्गावर ही रॅली होणार असून या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

पुणे-नाशिक महामार्गावरील बाबर पेट्रोल पंप ते जय गणेश साम्राज्य चौक दरम्यान जाणारी लेन बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक-पुणे मार्गावरील जय गणेश साम्राज्य चौक ते बाबर पेट्रोल पंप या मार्गादरम्यान दुहेरी वाहतूक सोडण्यात येईल. कै. अंकुशराव लांडगे सभागृह येथून भोसरी स्मशान भूमीकडे जाणारा मार्ग बंद असेल. दरम्यान, चांदणी चौक, पीएमटी चौक येथून टप्प्या-टप्प्याने वाहतूक सोडण्यात येईल. भोसरी अंडरब्रिज गावजत्रा मैदान येथून नाशिक महामार्गाकडे जाण्यास प्रवेश बंद असून दिघी व भोसरी आळंदी रोडने येणारी व नाशिक बाजूकडे जाणारी वाहतूक भोसरी ओव्हरब्रीजच्या उजव्या बाजूने वळविण्यात येईल. जय गणेश साम्राज्य चौक ते संविधान चौक (साने चौक) ही स्पाईन रोडची दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद राहील. बोऱ्हाडेवाडी या मार्गाने इच्छित स्थळी जाता येईल. तसेच स्पाईन रोडवरील सेवा रस्त्याने टप्प्या-टप्प्याने वाहतूक सोडण्यात येईल. टेल्को रोडने अनुकूल चौकाकडे येणाऱ्या वाहतुकीस टाटा मोटर्स येथे प्रवेश बंद असेल. ही वाहतूक गुलाब पुष्प उद्यानापासून इच्छितस्थळी जाईल. एचडीएफसी कॉलनी कडून घरकुलकडे येणारी वाहतूक घरकुलकडे न येता केएसबी चौकाकडून कुदळवाडी ब्रिजवरून जाईल. थरमॅक्स चौकाकडून कृष्णानगरकडे जाणारी वाहतूक दुर्गा चौक मार्गे त्रिवेणीनगर चौकाकडे जाईल. थरमॅक्स चौकाकडून कृष्णानगरकडे येणारी वाहतूक दुर्गा चौक मार्गे त्रिवेणीनगर चौकाकडे वळवली आहे. तसेच संविधान चौकाकडे त्रिवेणीनगर कडून येणारी वाहतूक दुर्गा चौक मार्गे थरमॅक्स चौकाकडे वळविण्यात आली आहे. स्पाईन रोडच्या सेवा रस्त्यावर काही ठिकाणी अंतर्गत रस्त्यावरील वाहतूक सुरू राहील. हा बदल रविवारी पहाटे साडे पाच ते सकाळी साडे नऊ या कालावधीसाठी असेल.