पिंपरी-चिंचवड शहराची आश्वासक ‘लीडरशीप’ - आमदार महेश लांडगे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड शहराची आश्वासक ‘लीडरशीप’ - आमदार महेश लांडगे
पिंपरी-चिंचवड शहराची आश्वासक ‘लीडरशीप’ - आमदार महेश लांडगे

पिंपरी-चिंचवड शहराची आश्वासक ‘लीडरशीप’ - आमदार महेश लांडगे

sakal_logo
By

- वर्धापन दिन राजकीय पुरवणी - शहरावरील विकासाभीमुख लेख - आमदार महेश लांडगे

हेडींग : पिंपरी-चिंचवड शहराची आश्वासक ‘लीडरशीप’
लेखक : आमदार महेश लांडगे
स्लग : शहर विकासासाठी कटीबध्द

औद्योगिकनगरी, कामगारनगरी, बेस्ट सिटी, स्मार्ट सिटी... यासह आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महापालिका, अशी अनेक बिरुदावरली मिरवणारे पिंपरी-चिंचवड. पिंपरी, चिंचवड, आकुर्डी आणि भोसरी अशा चार ग्रामपंचायतील मिळून दि.४ मार्च १९७० रोजी पिंपरी-चिंचवड नवनगरची निर्मिती करण्यात आली.
स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून पिंपरी-चिंचवड परिसरात औद्योगिक वसाहत विकसित झाली. पिंपरी-चिंचवड या औद्योगिकनगरीचे शिल्पकार म्हणून स्व. अण्णासाहेब मगर यांना ओळखले जाते. शहराचा चौफेर विस्तार आणि लोकसंख्या झपाट्याने वाढू लागल्यामुळे दि.११ ऑक्टोबर १९८२ रोजी पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थापना झाली. या शहराच्या विकासाच्या वाटचालीत स्व. अण्णासाहेब मगर, स्व. प्रा. रामकृष्ण मोरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे योगदान मोठे आहे.
शहराचे पहिले महापौर, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांच्यापासून आतापर्यंत किमान २९ महापौरांनी शहराचे नेतृत्व केले. ज्ञानेश्वर लांडगे, विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, गौतम चाबुकस्वार अशा दिग्गजांनी विधानसभेत शहराचा आवाज बुलंद केला. मात्र, या शहरातील नेतृत्वाला राज्याच्या मंत्रीमंडळात स्थान मिळाले नाही, ही सल कायम आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे आता शहराची सत्तासूत्रे एकवटली आहेत. पिंपरी-चिंचवड महापलिकेत आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांचे वर्चस्व आहे.

शास्तीकर पुर्ण माफ करणार
भारतीय जनता पार्टीची महापालिकेत २०१७ मध्ये माझ्या व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आल्यानंतर आम्ही शहरातील अनधिकृत बांधकाम, शास्तीकर, रेडझोन हे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. शास्तीकर १००० चौरस फुटापर्यंत माफ करण्यात यश मिळाले आहे. आता राज्यात पुन्हा भाजप व बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यामुळे शास्तीकर पुर्णपणे माफ करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहोत.

पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प राबविणार
इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प केंद्र व राज्य शासन, पीएमआरडीए व महापालिका यांच्यातीने राबवणार आहोत. त्याचबरोबर शहरातील पवना नदी सुधार प्रकल्प हाती घेण्यात आला असून लवकरच तो तडीस नेणार आहोत.

शहरात केलेली विकास कामे -
समाविष्ट गावांचा झपाट्याने विकास केला
शहरात १९९७ मध्ये समाविष्ट १७ गावांमध्ये विकास झालेला नव्हता. आम्ही सर्व प्रथम या भागावर लक्ष केंद्रीत केले व महापालिकेच्या माध्यमातून या भागात पहिल्या दोन-तीन वर्षातच तीन ते साडोतीन हजार कोटी रुपयांची कामे केली. त्यामुळेच मोशी, चऱ्होली ते चिखली पर्यंत झपाट्याने विकास झालेला दिसत आहे. स्मशाभुमीपासून ते आरोग्य सुविधांपर्यंत या भागात विकास कामे केली आहेत. शहरात अंतरराष्ट्रीय दर्जाचे कुसती संकुल व कबड्डी संकुल उभे करत आहोत. शहराला ‘स्पोर्ट सिटी’ अशी ओळख मिळावी, या दृष्टीने आम्ही काम करत आहोत.

आरोग्य सुविधा दारात देणार
शहरात उच्च शिक्षणाच्या संधी मिळाव्यात म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत.आरोग्याची सुविधा त्या-त्या भागातील रुग्णांना मिळावी म्हणून चिखली व मोशी येथे जिजाऊ क्लिनीक सुरु केले त्याच धर्तीवर शहरात विविध भागात ३० क्लिनीक सुरु करणार आहेत.

मेट्रोचे जाळे पूर्ण पिंपरी-चिंचवड व पुणे शहरापर्यंत विकसीत करणार
शहरात भक्ति-शक्ती समूह शिल्पाजवळ प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. त्या ठिकाणी ग्रेड सेपरेटर विकसीत करुन येथील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडविला. त्याच बरोबर शहरात मेट्रोची सुविधा पहिल्या टप्प्यात फुगेवाडी ते पिंपरी पर्यंत सुरु केली असून लवकरच ती सुविधा निगडी ते पुणे शहरात शिवाजीनगर, स्वारगेट व कात्रज पर्यंत नेणार आहोत. त्याचबरोबर चाकण ते हिंजवडी मेट्रो मार्गाचाही प्रस्ताव केंद्र सरकारला दिला आहे.

भविष्यात करण्यात येणारी विकास कामे
महाराष्ट्रातील सर्वात मोठी इंद्रायणी थडी, भारतातील सर्वांत मोठी ‘रिव्हर सायक्लोथॉन’, सर्वांत मोठी बैलगाडा शर्यत यासह विविध ‘बिग बजेट’ उपक्रम राबवले असून याद्वारे संपूर्ण राज्यभरातून प्रसिद्धी मिळत आहे. जगातील सर्वांत उंच छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा अर्थात ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’, आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र, आंतरराष्ट्रीय कबड्डी संकूल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ, शासकीय महाविद्यालय, पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठी ८५० बेडचे प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी-चिंचवड न्यायालयाची प्रस्तावित प्रशस्त इमारत असे लक्षवेधी प्रकल्प भाजपने हाती घेतले आहेत.
त्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे शहरातील सर्व पदाधिकारी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पाठींब्याने व राज्याचे मुख्यमंत्री पिंपरी-चिंचवडकरांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पायाभूत सुविधा विकसीत करणार आहेत.

भविष्यवेध -
- पुणे-नाशिक महामार्ग रुंदीकरण करुन नुसता विकसीत करण्यात येणार नाही तर तो इलीव्हेटेड महामार्ग करावा, अशी मागणी आम्ही नुकतीच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
- राष्ट्रीय ललित कला अकादमी सारख्या संस्थांना जागा देवून शहरात नामांकित संस्था आणून शिक्षणाबरोबरच कला व सांस्कृतक क्षेत्रातही विद्यार्थी घडविणार आहोत.
- देहू ते आळंदी असा इंद्रायणी नदी पात्रातून ‘सि लींक’ प्रमाणे भक्तिमार्ग बनविण्याचा आमचा संकल्प आहे.
- सोलापूर-मुंबई व पुणे-मुंबई महामार्गावरील अवजड वाहतूक कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र देवून शहरातील पर्यायी रस्त्यांची मागणी केलेली आहे.
- शहरात ‘सिग्नल फ्री’ वाहतूक यंत्रणा करण्याचा आमचा मानस आहे.
( शब्दांकन : जयंत जाधव)