तळेगाव दाभाडेत संविधान दिन उत्साहात साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगाव दाभाडेत संविधान दिन उत्साहात साजरा
तळेगाव दाभाडेत संविधान दिन उत्साहात साजरा

तळेगाव दाभाडेत संविधान दिन उत्साहात साजरा

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. २८: भारताचे संविधान अमलात आणल्यानंतर सन २०१५ पासून संपूर्ण देशात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी स्मारक समितीच्या वतीने संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी लोकशाहीच्या प्रमुख चार स्तंभांबद्दल माहिती देण्यात आली. तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. भारताचे संविधान लिहिणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यातील काही कालावधी तळेगाव दाभाडे येथील त्यांच्या निवासस्थानी व्यतीत केला होता. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातील काही महत्त्वपूर्ण घटना लिहिल्या असल्याने तळेगाव दाभाडे ही भूमी संविधान भूमी म्हणून जाहीर व्हावी अशी मागणी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती अध्यक्षा ॲड. रंजना भोसले यांनी केली. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने संपूर्ण परिसरामध्ये दिवे लावून रोषणाई करण्यात आली होती. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्ताविक एल.डी कांबळे यांनी केले, तर आभार सचिव किसन थुल यांनी मानले.