महागड्या वस्तू पाठविल्याच्या आमिषाने फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महागड्या वस्तू पाठविल्याच्या आमिषाने फसवणूक
महागड्या वस्तू पाठविल्याच्या आमिषाने फसवणूक

महागड्या वस्तू पाठविल्याच्या आमिषाने फसवणूक

sakal_logo
By

पिंपरी, ता. २८ : अमेरिकेतून महागड्या भेटवस्तू पाठवल्याचे आमिष दाखवून महिलेची साडे नऊ लाखांची ऑनलाइनद्वारे फसवणूक केली. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी यांना थॉमसन डेव्हिड याने इंस्टाग्रामवरून रिक्वेस्ट पाठवली. तसेच व्हाट्सअप कॉल करून अमेरिकेतून भेटवस्तू पाठवल्याचे आमिष दाखवले. त्यानंतर वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून बोलणाऱ्या महिलांनी फिर्यादी यांना त्यांच्या नावाने अमेरिकेतून पार्सल आल्याचे आमिष दाखवले. या पार्सलमध्ये खूप ज्वेलरी व महागड्या वस्तू असल्याचे सांगून त्यासाठी कस्टम ड्यूटी चार्ज, एंटी मनी लॉन्डरिंग व इतर अनेक चार्जेसच्या नावाखाली तसेच बँकेत खाते उघडण्याच्या नावाखाली वेगवेगळी कारणे सांगून नऊ लाख ४४ हजार ९३० रुपये भरण्यास भाग पाडले. त्यानंतर या रकमेचा अपहार करून फसवणूक केली. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.