Wed, Feb 8, 2023

रुपीनगरमध्ये दुर्गंधी युक्त सांडपाणी रस्त्यावर
रुपीनगरमध्ये दुर्गंधी युक्त सांडपाणी रस्त्यावर
Published on : 1 December 2022, 8:04 am
रुपीनगर येथील दक्षता मित्र मंडळ गणपती मंदिरासमोरील सांडपाणी वाहिनी तुंबल्याने दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत आहे. गेल्या सात दिवसांपासून रोज हे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाहनांमुळे पाणी लोकांच्या अंगावर उडत आहे. वाहने वाहत असलेल्या पाण्यातून घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाने ही समस्या त्वरित सोडवावी.
राजेश जाधव, रुपीनगर