निकृष्ट आहार पुरविणारी संस्था महापालिकेकडून काळ्या यादीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निकृष्ट आहार पुरविणारी संस्था
महापालिकेकडून काळ्या यादीत
निकृष्ट आहार पुरविणारी संस्था महापालिकेकडून काळ्या यादीत

निकृष्ट आहार पुरविणारी संस्था महापालिकेकडून काळ्या यादीत

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ ः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा आहार पुरवठा करणाऱ्या सावित्री महिला स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला आयुक्त शेखर सिंह यांनी दणका दिला आहे. या संस्थेचे काम काढून घेत काळ्या यादीत टाकले. हे काम इस्कॉनच्या अन्नामृत फाउंडेशनला देण्यात आले आहे.
महापालिका शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये सावित्री महिला स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला ६ ऑगस्ट २०२२ रोजी काम दिले होते. महापालिकेच्या १३ शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शालेय पोषणाचे काम या संस्थेला दिले होते. पण, या संस्थेकडून पुरवठा करण्यात असलेल्या खिचडीचा निकृष्ट दर्जा, सकस सुका खाऊ नियमित पुरवठा होत नसल्याबाबत आणि संस्थेकडून पुरवठा होत असलेल्या भातात काचेचा, प्लास्टिकचा तुकडा, आळ्या, केस सापडत असल्याबाबतच्या विविध शाळांच्या मुख्याध्यापकांनी तक्रारी केल्या. तसेच माजी नगरसेवकानेही तक्रार केली. या संस्थेने कारणे दाखवा नोटिशीलाही मुदतीत उत्तरे दिली नाहीत.
संस्थेबाबत येणाऱ्या तक्रारी, असमाधानकारक खुलासा आणि निकृष्ट दर्जाचा, खाण्यास अयोग्य असलेला पुरवठा केला जात असलेला पोषण आहार यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास, आरोग्यास हानी पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. वारंवार लेखी, तोंडी स्वरूपात कळवूनही पोषण आहारामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून, या संस्थेला दिलेले पोषण आहार पुरवठ्याचे कामकाज काढून घेण्यात आले. या संस्थेस भविष्यात आहार पुरवठ्याबाबत निविदा भरण्यास प्रतिबंध करत काळ्या यादीतही टाकण्यात आले.