Wed, March 29, 2023

अंमली पदार्थ विक्री करणारा अटकेत
अंमली पदार्थ विक्री करणारा अटकेत
Published on : 2 December 2022, 3:21 am
पिंपरी, ता. २ : अफूच्या बोंडाचा चुरा (पॉपी स्ट्रॉ) व आफीम हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जेरबंद केले. ही कारवाई मुकाईनगर येथे करण्यात आली.
गोपाळ कृष्णराम खिलेरी (वय ४०, रा. मुकाईनगर, हिंजवडी, मूळ - जोधपूर, राजस्थान) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार दिनेश बिष्णोई याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी गोपाळ याने पॉपी स्ट्रॉ शहरात विक्रीसाठी आणल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार त्याच्या घराजवळ पथकाने सापळा रचला. गोपाळ त्याच्या दुचाकीवरून पॉपी स्ट्रॉ विक्रीसाठी जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
-----------------------