
Baba Kamble : रिक्षा कृती समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी बाबा कांबळे
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये राज्यभरातील सर्व रिक्षा चालक मालकांची संयुक्त कृती समिती स्थापन केली असून, तिच्या प्रदेशाध्यक्षपदी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांची शुक्रवारी (ता. २) बिनविरोध निवड करण्यात आली. सरचिटणीपदी कासम मुलाणी, कार्याध्यक्षपदी वैजनाथ देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरीत राज्यभरातील रिक्षा चालक-मालक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. नांदेड येथील वैजनाथ देशमुख परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. राज्यभरातून संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी नरेंद्र गायकवाड (नांदेड), गफारभाई नदाफ (कराड), आनंद तांबे ,बापू भावे (पुणे), रामभाऊ पाटील फिरोज मुल्ला (सांगली), कासम मुलाणी (मुंबई), आनंद चौरे, रवी तेलरंदे (नागपूर), राहुल कांबळे (कल्याण -डोंबिवली), तानाजी मासलकर, बाळू फाळके (सोलापूर), शिवाजी गोरे, आशिष देशपांडे (ठाणे), बल्लूर स्वामी (इचलकरंजी) सानी हुमने, अब्बास भाई (चंद्रपूर) आदीसह राज्यभरातून विविध संघटनांचे प्रतिनिधी, रिक्षा चालक-मालक उपस्थित होते.