शेलार, डोळस, बोकील, जोशी ब्रॅंड अॅम्बेसिडर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेलार, डोळस, बोकील, 
जोशी ब्रॅंड अॅम्बेसिडर
शेलार, डोळस, बोकील, जोशी ब्रॅंड अॅम्बेसिडर

शेलार, डोळस, बोकील, जोशी ब्रॅंड अॅम्बेसिडर

sakal_logo
By

पिंपरी, ता. ४ ः स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत स्वच्छतेची लोकचळवळ व्यापक करण्यासाठी महापालिकेने ‘स्वच्छ भारत अभियान ब्रॅंड अॅम्बेसिडर’ नियुक्त केले आहेत. त्यात क्रीडा क्षेत्रातील पूजा शेलार, ज्येष्ठ कलाकार सुरेश डोळस, तृतीयपंथी शिवान्या पंकजा बोकील, अपंग संवर्गातून संगीता जोशी- काळभोर व मुख्याध्यापक मनोज देवळेकर यांचा समावेश आहे. त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

शहराला देशातील सर्वात सुंदर शहर बनविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. त्यासाठी स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत असून त्यात लोकसहभाग महत्त्वाचा आहे. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये स्थानिक नागरिकांमधून कलाकार, डॉक्टर, खेळाडू, शिक्षक, विशेषत: अपंग व ट्रान्सजेन्डर यांना ब्रॅन्ड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्त करण्याचा आदेश आहे. त्यानुसार महापालिकेने शेलार, डोळस, बोकील, जोशी, देवळेकर यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या समवेत उपआयुक्त अजय चारठाणकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यास आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, स्वच्छ भारत अभियान समन्वयक विनोद जळक आदी उपस्थित होते.
स्वच्छाग्रहाचे पेनस्टँड व बॅचेस देवून त्यांचे स्वागत केले. स्वच्छ सर्वेक्षणाची कार्यपद्धतीची माहिती चारठाणकर यांनी दिली. ब्रॅन्ड ॲम्बेसिडर यांची भूमिका स्पष्ट करून स्वच्छतेचे महत्त्व, कचरा विलगीकरण, घनकचरा व्यवस्थापन, स्टीचिंग युनिट, नवी दिशा, प्लास्टिक बंदी यांची माहिती समजावून सांगितली. ब्रॅन्ड ॲम्बेसिडर यांची मते जाणून घेतली. त्यांना येणाऱ्या समस्या, त्यांच्या संकल्पना, नविन उपक्रम, त्यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमांचे स्वागत केले जाईल, असे चारठाणकर यांनी स्पष्ट केले.