रिक्त पदे भरण्याची विद्यार्थ्यांची मागणी नगररचना व मूल्य निर्धारण संचालनालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्त पदे भरण्याची
विद्यार्थ्यांची मागणी 
नगररचना व मूल्य निर्धारण संचालनालय
रिक्त पदे भरण्याची विद्यार्थ्यांची मागणी नगररचना व मूल्य निर्धारण संचालनालय

रिक्त पदे भरण्याची विद्यार्थ्यांची मागणी नगररचना व मूल्य निर्धारण संचालनालय

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ : नगररचना व मूल्य निर्धारण संचालनालय आस्थापनेवरील सहायक नगररचनाकार, महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्य निर्धारण सेवा श्रेणी १ गट ब संवर्गातील १०० टक्के रिक्त पदे भरण्याची मागणी राज्यातील शैक्षणिक अहर्ताधारक पात्र विद्यार्थ्याकडून होत आहे.
याबाबत शैक्षणिक अर्हताधारक पात्र विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाच्या राज्यनगर विभागाचे १६ सप्टेंबर २०२१ च्या पत्रानुसार नगररचना व मूल्य निर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील सहायक नगररचनाकार महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्य निर्धारण सेवा श्रेणी १ गट-ब संवर्गातील २७६ रिक्त पदांपैकी १३८ (५० टक्के प्रमाणात) पदे भरण्यास उपसमितीने मान्यता दिलेली आहे. विभागाच्या मागणीपत्रानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक नगररचनाकार पद भरतीसाठी १३८ जागेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. परंतु, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या ३१ ऑक्टोबर २०२२ च्या शासन निर्णयानुसार
नुकत्याच झालेल्या सरळसेवा चाळणी परीक्षा २० नोव्हेंबर २०२२ मध्ये १७,४०० विद्यार्थी परीक्षेत पात्र होते. मात्र, केवळ १३८ जागा असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली. राज्य सरकारने पूर्ण मंजूर पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणी पत्र दिल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नसल्याचे स्पर्धक मुलांचे म्हणणे आहे.
तीनशे जागा रिक्त आहेत. मुलांना चांगले गुण पडले आहेत. जागा वाढल्यास मुलांना संधी मिळेल. त्यामुळे, जागा न भरल्या गेल्यास मुलांचे नुकसान होइल. ही पदे तातडीने भरणे गरजेचे आहे.
- प्रथमेश भोसले, विद्यार्थी, पुणे
--
सहायक नगररचनाकार पदासाठी मी परीक्षा दिली आहे. शंभर टक्के पदे भरली जातील, असा शासन निर्णय काढण्यात आला होता. परंतु, त्यानुसार जागा वाढल्या गेल्या नाहीत. त्यातही अपुरी पदे असल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांच्या पदरी निराशा आली आहे. मुलांचे नुकसान होत आहे.
- कल्पेश वहाडणे, विद्यार्थी, धायरी