सराईत गुन्हेगाराचा खून व्यावसायिक स्पर्धेतून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सराईत गुन्हेगाराचा खून व्यावसायिक स्पर्धेतून
सराईत गुन्हेगाराचा खून व्यावसायिक स्पर्धेतून

सराईत गुन्हेगाराचा खून व्यावसायिक स्पर्धेतून

sakal_logo
By

पिंपरी, ता. ४ : दोन दिवसांपूर्वी चिंचवडमधील मोहननगर येथे झालेला सराईत गुन्हेगाराचा खून व्यावसायिक स्पर्धेतून तसेच जुन्या भांडणावरून झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी १९ जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी पाच जणांना अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
राजू मरिबा कांबळे (वय ३२), सिद्धया मरिबा कांबळे (वय २८), कच्चा ऊर्फ मिलिंद मरिबा कांबळे (वय ३५, तिघेही रा. महात्मा फुले नगर, मोहननगर, चिंचवड), यश सुभाष कुसाळकर (वय १९, रा. रामनगर), मोहन भीमराव विचटकर (वय १९, रा. रामनगर, चिंचवड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर दाद्या ऊर्फ विशाल मरिबा कांबळे, विशाल लष्करे, सीजे ऊर्फ चैतन्य जावीर, ओमकार शिंदे, यश कुसाळकर, करण गायकवाड, रोहित मांजरेकर, सूरज मोहिते, नीलेश लष्करे, बालाजी कोकाटे, अल्पवयीन मुलगा व इतर तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर विशाल नागू गायकवाड (वय ३८, रा. मोरेवस्ती, चिखली) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ अर्जुन नागू गायकवाड (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी अर्जुन व त्यांचा भाऊ विशाल हे दोघेजण वॉशिंग सेंटर चालवतात. आरोपींपैकी एकाचेही वॉशिंग सेंटर आहे. दरम्यान, व्यावसायिक स्पर्धेतून आरोपींनी विशालच्या खूनाचा कट रचला. काही दिवसांपूर्वी कांबळे यांचे कुटुंबीय व फिर्यादी यांच्यात भांडण झाले होते. त्याचाही राग आरोपीच्या मनात होता. यातून शुक्रवारी सायंकाळी आरोपींच्या टोळक्याने विशालवर कोयत्याने वार केले. एका आरोपीने पिस्तुलातून हवेत गोळ्या झाडल्या. यामुळे परिसरात दहशत पसरली. जखमी विशालला खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अटक आरोपींना न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.