Thur, Feb 9, 2023

डॉ. आंबेडकर चौकातील वाहतुकीत आज बदल
डॉ. आंबेडकर चौकातील वाहतुकीत आज बदल
Published on : 5 December 2022, 2:19 am
पिंपरी, ता. ५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरीतील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून मंगळवारी (ता. ६) दिवसभर परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
बदल असा
-चिंचवडमधील महावीर चौकाकडून सेवा रस्त्याने येणारी वाहतूक बंद करून डी मार्ट येथून ग्रेड सेपरेटरमधून जाईल
- नाशिक फाट्याकडून सेवा रस्त्याने येणारी वाहने डेअरी फार्म व खराळवाडीतील एच.पी. पेट्रोल पंप येथील ग्रेड सेपरेटरमध्ये वळतील.
- इंदिरा गांधी पुलावरून येणारी वाहने पुलावरून मोरवाडी चौकाकडे जाऊन इच्छितस्थळी जातील.
- नेहरूनगर चौकाकडून येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद. ही वाहने एचए कॉर्नर बस थांबा येथून मासुळकर कॉलनी व तेथून इच्छितस्थळी जातील.