डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना साहित्यिकांकडून आदरांजली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना
साहित्यिकांकडून आदरांजली
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना साहित्यिकांकडून आदरांजली

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना साहित्यिकांकडून आदरांजली

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ ः ज्येष्ठ साहित्यिक व समिक्षक प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना शहरातील साहित्यिकांनी आदरांजली वाहिली. साहित्य संवर्धन समितीतर्फे चिंचवड येथील जिजाऊ पर्यटन केंद्रात झालेल्या आदरांजली सभेला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, श्रीकांत चौगुले, राज अहेरराव, नाना शिवले, प्रदीप गांधलीकर, सविता इंगळे, शोभा जोशी, सुहास घुमरे, प्रकाश निर्मळ, मधुश्री ओव्हाळ, विवेक कुलकर्णी, हेमंत जोशी, प्रा. धनंजय भिसे, समिती अध्यक्ष सुरेश कंक आदी उपस्थित होते. डॉ. कोत्तापल्ले यांच्या आठवणींना सर्वांनी उजाळा दिला. ‘‘डॉ. कोत्तापल्ले यांनी पुरोगामी विचार पेरण्याचे काम केले. त्यांच्या जाण्याने पिंपरी चिंचवडचे बौद्धिक वैभव हरपले आहे.’’, असे मत प्रभुणे यांनी व्यक्त केले. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष चव्हाण यांनी संयोजन केले.