डॅा.बाबासाहेब आंबेडकर निवासस्थानी महापरिनिर्वाण दिनी कँडल मार्च | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॅा.बाबासाहेब आंबेडकर निवासस्थानी महापरिनिर्वाण दिनी कँडल मार्च
डॅा.बाबासाहेब आंबेडकर निवासस्थानी महापरिनिर्वाण दिनी कँडल मार्च

डॅा.बाबासाहेब आंबेडकर निवासस्थानी महापरिनिर्वाण दिनी कँडल मार्च

sakal_logo
By

तळेगाव दाभाडे (स्टेशन),ता. ७ : भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॅा. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने
रेल्वे स्टेशन येथील प्रज्ञा ज्ञाद बुध्द विहार ते आंबेडकर निवासस्थान असा कँडल मार्च काढण्यात आला. समितीच्या वतीने मोठ्या संख्येने विद्यार्थांना वही-पेन देवून बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यात आली. निवासस्थान परिसरात विद्यूत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी पांढरा पोशाख परिधान करून भीमप्रेमी महिला व नागरिक उपस्थित होते. समितीच्या अध्यक्षा अॅड. रंजना भोसले यांनी उपस्थित जनसमुदायाला बाबासाहेबांच्या कार्याची माहिती सांगितली. सर्व भीमप्रेमींनी कँडल प्रज्वलित करून बाबासाहेबांना अभिवादन केले. तळेगाव दाभाडे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीन लांडगे वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गजरमल यांच्या सहकार्यांनी कँडल मार्च मिरवणुकीत पोलिस बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त जायंट्स ग्रुप आॅफ तळेगाव दाभाडे यांच्यामार्फत विश्र्वरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यांच्या सहकार्याने (ता.६) रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यानिमित्त तळेगावकर, मावळवासियांनी तसेच संस्थेच्या सदस्यांनी या भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. समता सैनिक दल ७६ सदस्यांनी रक्तदान केले.