आयुक्त बंगल्यासमोरील आंदोलक पोलिसांच्या ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयुक्त बंगल्यासमोरील आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
आयुक्त बंगल्यासमोरील आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

आयुक्त बंगल्यासमोरील आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ः निगडी येथील आण्णा भाऊ साठे पीएमपी बस टर्मिनल शेजारी रेड झोन आहे. त्यामध्ये बेकायदेशीर बांधकाम करून स्वच्छतागृह व चार व्यापारी गाळे बांधले आहेत. त्याबाबत तक्रार करूनही कारवाई केली जात नसल्याने महापालिका प्रशासक शेखर सिंह यांच्या निवासस्थानासमोर (आयुक्त बंगला, मोरवाडी) बुधवारी (ता. ७) थाळीनाद आंदोलन करण्याचा व चप्पल- बुटांचा हार भेट देण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी दिला होता. मात्र, त्यांना बुधवारी पहाटेच राहत्या घरातून निगडी पोलिसांनी ताब्यात घेऊन दिवसभर ठाण्यातच बसवून ठेवले. निगडीतील स्वच्छतागृह व व्यापारी गाळे असलेली जागेचे मूल्य कोट्यवधी रुपये आहे. मात्र, ती जागा विनामूल्य दिली आहे. शिवाय, रेड झोन क्षेत्र असूनही बांधकाम केले आहे. तसेच, शहरातील २६ ठिकाणच्या जागा विनामूल्य देण्यात आले असून प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप काळभोर यांनी केला आहे.