वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धे
वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धे

वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धे

sakal_logo
By

पिंपरी : पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने ८४ व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या काउन्ट डाऊन ७५ आणि मॅस्कॉट अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार (ता.९) रोजी पिंपरी चिंचवड मधील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात हा कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता होणार आहे. पीडीएमबीएचे सचिव रणजीत नातू म्हणाले, १९९७ मध्ये ही स्पर्धा पुण्यात झाली होती त्या नंतर २५ वर्षांनी हा मान पुन्हा पुण्याला मिळत आहे. पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल, लक्ष्य सेन, सात्विक साईराज, चिराग शेट्टी, एच.एस. प्रणॉय, किदाम्बी श्रीकांत, यासह अनेक नामांकित खेळाडू या स्पर्धेत आपले कौशल्य दाखवणार आहेत. पीडीएमबीए यंदा अमृत महोत्सव साजरा करत आहे. गोपीचंद आणि मंजूषा यांना बोलावण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका या स्पर्धेचे सह-यजमान आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन अध्यक्ष अरुण लखानी, शेखर सिंग, जसविंदर नारंग, भारतीय बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक पी.गोपीचंद, मंजूषा पावनगडकर कंवर उपस्थित राहणार आहेत.