संघटनांकडून आज शहर ‘बंद’; पोलिसांचा जमाव बंदी आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संघटनांकडून आज शहर ‘बंद’;
पोलिसांचा जमाव बंदी आदेश
संघटनांकडून आज शहर ‘बंद’; पोलिसांचा जमाव बंदी आदेश

संघटनांकडून आज शहर ‘बंद’; पोलिसांचा जमाव बंदी आदेश

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ ः महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ बहुजन महापुरुष सन्मान समितीने गुरुवारी (ता. ८) शहर बंदची हाक दिली आहे. त्याला राजकीय पक्षांसह विविध संस्था, संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, शहरासह संपूर्ण पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय क्षेत्रात रविवारी (ता. ११) रात्री बारावाजेपर्यंत जमाव बंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे बंद यशस्वी होईल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, कष्टकरी संघर्ष महासंघ. एमआयएम. मूलनिवासी मुस्लिम मंच, जमाते उलेमा, काँग्रेस, आप, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, वंचित बहुजन आघाडी, बौद्ध समाज विकास महासंघ, मराठा क्रांती मोर्चा, आझाद समाज पक्ष, राष्ट्रीय इसाई महासंघ, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, कष्टकरी संघटना महासंघ, बहुजन सम्राट सेना, महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट, भारतीय बौद्ध महासभा, भीमशाही युवा संघटना, अपना वतन संघटना, बारा बलुतेदार महासंघ, फेरीवाला हॉकर्स महासंघ, ओबीसी संघर्ष समिती आदी संघटनांनी बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शिवाय, कोल्हापूर येथील युवराज छत्रपती संभाजीराजे दुपारी बारा वाजता सहभागी होणार आहेत. मात्र, कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त क्षेत्रात २८ नोव्हेंबरपासून ११ डिसेंबरपर्यंत मुंबई पोलिस अधिनियम १९५१ नुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना जमाव जमवणे, मिरवणुका काढणे, रास्ता रोको, मोर्चे, धरणे, निदर्शने, आत्मदहन, उपोषण यासारखे आंदोलन करण्यास प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. त्यामुळे उद्याच्या बंदबाबत व पिंपरी चौकातील आंदोलनाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
--