शाळा व विद्यार्थ्यांसाठी ‘जल्लोष... शिक्षणाचा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा व विद्यार्थ्यांसाठी
‘जल्लोष... शिक्षणाचा’
शाळा व विद्यार्थ्यांसाठी ‘जल्लोष... शिक्षणाचा’

शाळा व विद्यार्थ्यांसाठी ‘जल्लोष... शिक्षणाचा’

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ ः महापालिका प्रशासक शेखर सिंह यांच्या संकल्पनेतून आणि शिक्षण विभाग व सिटी ट्रान्सफर्मेशन ऑफीस (सीटीओ) यांच्या संयुक्त आयोजनातून ‘जल्लोष... शिक्षणाचा २०२२’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक, गुणात्मक व नाविण्यपूर्ण विचार वाढीसाठी विद्यार्थी व शालेय स्तरावर एक डिसेंबर ते २६ जानेवारी या कालावधीत स्पर्धा होत आहे. तसेच, २४ ते २६ जानेवारी या कालावधीत आनंदोत्सव आयोजित केला आहे.

शाळांसाठी स्पर्धा
- शाळा स्पर्धांतर्गत मूल्यमापन समिती स्थापन केली असून मापदंड पडताळणी करेल
- शाळा स्तरावरचे मूल्यांकन १५ ते ३० डिसेंबर या कालावधीत होईल
- प्रत्येक झोनमधून महापालिकेची प्रत्येकी एक शाळा याप्रमाणे आठ शाळा मॉडेल ठरतील
- बक्षीस रकमेतून २५ टक्के रक्कम शाळेच्या विकासावर खर्च करण्याचा अधिकार शाळेला
- उर्वरित ७५ टक्के रक्कम शाळेस मॉडेल स्कूल बनविण्यासाठी खर्च केली जाईल

विद्यार्थ्यांसाठी योजना...
- महापालिका व खाजगी शाळांसाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा होईल
- प्रत्येक शाळेतून पाचवी ते नववीतील पाच विद्यार्थ्यांचा एक गट असेल
- किमान पाच ते १० गट स्पर्धेत सहभागी होतील
- प्रत्येक गटाने स्मार्ट सिटी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, पर्यावरण, आरोग्य आदी विषयांवर सादरीकरण व मॉडेल तयार करावे
- मुख्याध्यापक व शिक्षक प्रत्येक शाळेतून एक किंवा दोन उत्कृष्ट गटाची निवड करून आंतरशालेय स्पर्धेसाठी नोंदणी करतील
- विद्यार्थी स्तरावरचे मूल्यांकन १५ ते ३० डिसेंबर या कालावधीत होईल
- आंतरशालेय स्पर्धेत महापालिका व खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना वेगवेगळी पारितोषिके दिली जातील

तीन दिवसीय आनंदोत्सवामध्ये विजेत्या शाळा व विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार केला जाईल. यावेळी विद्यार्थ्यांचे प्रकल्प प्रदर्शित करणारे स्टॉल्स्, कार्यशाळा, प्रश्नमंजूषा, सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्यपदार्थ स्टॉल्स्, गेमझोन, एरो मॉडेलिंग शो आदी उपक्रम असेल.
- संदीप खोत, उपआयुक्त, शिक्षण विभाग, महापालिका
---