अधिकारी घेताहेत प्रशिक्षण, प्रशासक करणार शिस्तभंगाची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अधिकारी घेताहेत प्रशिक्षण, प्रशासक करणार शिस्तभंगाची कारवाई
अधिकारी घेताहेत प्रशिक्षण, प्रशासक करणार शिस्तभंगाची कारवाई

अधिकारी घेताहेत प्रशिक्षण, प्रशासक करणार शिस्तभंगाची कारवाई

sakal_logo
By

पिंपरी, ता. ९ ः महापालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील वर्ग एक ते चार संवर्गातील अधिकारी, कर्मचारी हे सेवा कालावधीत प्रशिक्षण, उच्चशिक्षण, पुढील शिक्षण व अध्ययन रजा परवानगी न घेता करत आहेत. यापुढे परवानगीविना अध्ययन रजा घेत असल्याचे निदर्शनास आल्यास शिस्तभंगाची कारवाईचा इशारा प्रशासक शेखर सिंह यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी परिपत्रक जारी केले आहे.

अधिकारी, कर्मचारी सेवा कालावधीतच प्रशिक्षण, उच्चशिक्षण, पुढील शिक्षण व अध्ययन रजा महापालिकेची परवानगी न घेता करत आहेत. यामध्ये शासनाने विहित केलेल्या मान्यताप्राप्त विद्यापिठांखेरीज अन्य संस्थांमध्ये शिक्षण घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुढे सेवाविषयक गुंतागुंत व समस्या निर्माण होतात असेही निदर्शनास आलेले आहे. याशिवाय ही बाब कार्यालयीन शिस्तीस धरुन नाही. त्यामुळे कार्यालयीन कर्तव्य व जबाबदारीमध्ये बाधा येऊन कार्यालयीन कामकाजावर परिणाम होतो.परवानगी न घेता अध्ययन रजा घेत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकात स्पष्ट केले आहे.