रंगयात्री महोत्सव उत्साहात सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रंगयात्री महोत्सव उत्साहात सुरु
रंगयात्री महोत्सव उत्साहात सुरु

रंगयात्री महोत्सव उत्साहात सुरु

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ : पैस कल्चरल फाउंडेशन आणि थिएटर वर्कशॉप कंपनी यांच्या वतीने आयोजित रंगयात्री (रसिककला सेतू) महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. थिएटर वर्कशॉप कंपनीच्या चिंचवड येथील ‘पैस रंगमंच’ येथे हा महोत्सव ११ ते १७ डिसेंबर या कालावधीत दररोज सायंकाळी सहा ते नऊ यावेळेत होत आहे. हा महोत्सव निःशुल्क असून, अधिकाधिक रसिकांनी महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर पवार यांनी केले आहे.
थिएटर वर्कशॉप कंपनीच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणारी पैस करंडक ही एकपात्री आणि नाट्यछटा स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धेला कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनिहानिर्मित रमेश भिडे यांचे ‘मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हे एकपात्री नाटक सादर झाले. प्रेक्षकांचा प्रतिसाद या नाटकाला लाभल्याचे आयोजकांनी सांगितले.