
प्रशांत दामले यांना आज नाट्य परिषदेतर्फे मानपत्र
पिंपरी, ता. ११ ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियोजन समितीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच,
अभिनेते प्रशांत दामले यांना मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी दिली आहे.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात सोमवारी (ता. १२) सायंकाळी पाचला दामले यांची मुलाखत होणार आहे. त्यानंतर ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हा नाट्यप्रयोगही सादर केला जाणार आहे. कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य असून, प्रवेशिका प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे उपलब्ध आहेत.
तसेच, नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या सुरवातीपासून सभासद असलेल्या चिंचवडमधील रहिवासी आमदार उमा खापरे यांची विधानपरिषद सदस्यपदी निवड झाली आहे. याप्रसंगी खापरे यांचा गौरव करण्यात येणार आहे.