युवा महाराष्ट्र तर्फे गरजूंना ब्लॅंकेट्सचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवा महाराष्ट्र तर्फे गरजूंना ब्लॅंकेट्सचे वाटप
युवा महाराष्ट्र तर्फे गरजूंना ब्लॅंकेट्सचे वाटप

युवा महाराष्ट्र तर्फे गरजूंना ब्लॅंकेट्सचे वाटप

sakal_logo
By

पिंपरी, ता. ११ : माणुसकीची शाल उपक्रमांतर्गत शनिवारी १० डिसेंबर रोजी डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे युवा महाराष्ट्र समूह विद्यार्थ्यांतर्फे पहिल्या टप्प्यात निगडी, कासारवाडी, चिंचवड, आकुर्डी, दापोडीमधील गरजूंना ८० ब्लॅंकेट्स व थंडीपासून बचावासाठी टोप्यांचे वाटप करण्यात आले.

या दरम्यान युवा महाराष्ट्राच्या स्वयंसेवकांतर्फे कोरोना नियमावलीचे व शासन निर्देशांचे तंतोतंत पालन करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात भोसरी व आळंदी घाट परिसरात ब्लॅंकेट्सचे वाटप करण्यात आले. उपक्रमाचे स्थानिक रहिवाशांनी कौतुक करत पुढील वाटचालीसाठी स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या.