Sun, Feb 5, 2023

शहरात बरसल्या
हलक्या सरी
शहरात बरसल्या हलक्या सरी
Published on : 11 December 2022, 2:03 am
पिंपरी, ता. ११ : शहरात रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. भोसरी, कासारवाडी, दिघी, पिंपळे गुरव, चिंचवड स्टेशन, चिंचवडगाव, आकुर्डी आदी भागात पावसाने हजेरी लावली. दिवसभरात तापमानाचा कमाल पारा २४ अंशावर होता. दिवसभर वातावरणात गारवा होता. परंतु, सध्याचे हवामान आरोग्यास काही अंशी हानिकारक असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. पावसाने अचानक हजेरी लावल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. चार दिवस दिलेल्या पावसाच्या इशाऱ्यामुळे जोरदार सरी बरसण्याची शक्यता वाटत असल्याने किरकोळ विक्रेते, नागरिक भांबावून गेले.