
पिंपळे सौदागरला रविवारी ‘यशदा’ हाफ मॅरेथॉन
पिंपरी, ता. १३ ः किसान स्पोर्टस् इंडियाच्या व शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशनच्या सहकार्याने सत्यजित काटे यांच्या स्मरणार्थ रविवारी (ता. १८) यशदा पिंपरी-चिंचवड हाफ मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. पिंपळे सौदागर येथे होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये सहभागासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू आहे.
पिंपळे सौदागर परिसरात मोठ्या प्रमाणावर आयटी अभियंत्ते वास्तव्यास आहेत. अत्यंत नियोजनबद्धपणे परिसर विकसित झाला आहे. किसान स्पोर्टस् इंडियाच्या व शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशनच्या सहकार्याने यशदा पिंपरी-चिंचवड हाफ मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. यात धावताना लिनियर गार्डनचे सौंदर्य अनुभवता देईल. त्यामुळे २१ किलोमीटर, १० किलोमीटर आणि पाच किलोमीटर या तीन प्रकारांत मॅरेथोनमध्ये सहभागी होता येईल. टी-शर्ट, फिनिशर्स मेडल, टायमिंग ई-सर्टिफिकेट, झुंबा वॉर्मअप आणि कूल डाऊन, हायड्रेशन, रूट सपोर्ट, मेडिकल सपोर्ट, रन नंतरचा नाश्ता, विजेत्यांना ट्रॉफी आणि रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
आज कोरोनानंतर प्रत्येक व्यक्ती ही आरोग्याची काळजी घेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून यशदा रिॲलिटीतर्फे शहर परिसरातील नागरिकांसाठी ही स्पर्धा होत आहे. सुरक्षित रस्ते हे पिंपळे सौदागरच्या या मॅरेथॉनचे वैशिष्ट्य राहणार आहे. सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे.
- वसंत काटे, अध्यक्ष, यशदा रिॲलिटी