सेवा विकास बँकेच्या अधिकाऱ्यांचा विनयभंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवा विकास बँकेच्या  अधिकाऱ्यांचा विनयभंग
सेवा विकास बँकेच्या अधिकाऱ्यांचा विनयभंग

सेवा विकास बँकेच्या अधिकाऱ्यांचा विनयभंग

sakal_logo
By

पिंपरी, ता. १३ : खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत पिंपरीतील सेवा विकास बँकेतील एका महिला सहकारी अधिकाऱ्यांचा विनयभंग करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज बक्षानी यांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणी बँकेच्या महिला भागधारकांनी बँकेचे अवसायक दादासाहेब काळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनीही त्वरित कार्यवाही करुन संबंधित आरोपीस अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मनोज बक्षानी यांच्याविरोधात बँकेतील एका महिला अधिकाऱ्यांचा विनयभंग केल्याचा फौजदारी गुन्हा रविवार (ता.११) दाखल केलेला आहे. दरम्यान, पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात,‘मागील दीड वर्षापासून मनोज लक्ष्मणदास बक्षाणी हा मला वारंवार त्याच्या कार्यालयात बोलावून श्रीचंद आसवानी यांच्या सांगण्याप्रमाणे तू काम केले नाही तर; तुला कोणत्याही खोट्या गुन्ह्यात अडकावून कामावरून काढून टाकेल’, अशी वारंवार धमकी देत आहे, असे म्हटले आहे. आपल्या पदाचा गैरवापर करुन महिलांवर अत्याचार करणाऱ्या अशा नाराधमांची बँकेतून हकालपट्टी करणे गरजेचे आहे. या व्यक्तीला उच्चपदावर बसण्याचे नैतिक अधिकार नाही. अशा व्यक्तीमुळे महिला कर्मचारी व बँकेत येणाऱ्या इतर महिलांना व सभासदांना असुरक्षित वाटू लागले आहे. तरी मनोज बक्षाणी या मदमाशाला त्वरित निलंबित करण्यात यावे. अन्यथा बँकेवर महिलांचा मोर्चा व आंदोलन करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी, असा इशाराही निवेदनात दिला आहे. निवेदनावर मनिषा गायकवाड, मोनिका गायकवाड, आशा गांगुर्डे, जयसिंथा फ्रान्सिस, नीता गौड, उमा कुचेकर, संगिता दिवटे, अनिता पाटील, सिमा कुचेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.