‘विनयभंग करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘विनयभंग करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा’
‘विनयभंग करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा’

‘विनयभंग करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा’

sakal_logo
By

पिंपरी, ता. १३ : खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत सेवा विकास बँकेतील एका महिला अधिकाऱ्यांचा विनयभंग करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज बक्षानी यांना निलंबित करावे, अशी मागणी महिला भागधारकांनी अवसायक दादासाहेब काळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनीही त्वरीत कार्यवाही करुन संबंधित आरोपीस अटक करावी, अशी मागणी केली आहे. बक्षानी यांच्याविरोधात बँकेतील महिला अधिकाऱ्यांचा विनयभंग केल्याचा फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात, ‘मागील दीड वर्षापासून मनोज बक्षाणी हा मला वारंवार त्याच्या कार्यालयात बोलवून श्रीचंद आसवानी यांच्या सांगण्याप्रमाणे तू काम केले नाही तर; तुला कोणत्याही खोट्या गुन्ह्यात अडकावून कामावरुन काढून टाकेल’, अशी वारंवार धमकी देत आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे बक्षानी यांना निलंबित करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यात मनीषा गायकवाड, मोनिका गायकवाड, आशा गांगर्डे, जयसिंथा फ्रान्सीस, नीता गौड, उमा कुचेकर, संगिता दिवटे, अनिता पाटील, सीमा कुचेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.