ख्रिसमसच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कार्यक्रमांची रेलचेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ख्रिसमसच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कार्यक्रमांची रेलचेल
ख्रिसमसच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कार्यक्रमांची रेलचेल

ख्रिसमसच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कार्यक्रमांची रेलचेल

sakal_logo
By

पिंपरी, ता. १३ ः कोरोनामुळे दोन वर्षे ख्रिसमस साजरा झाला नाही. त्यामुळे यंदा ख्रिस्ती बांधवांच्या उत्साहाला उधाण आले आहे. येशू जन्मानिमित्त नाताळची जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्त शहर-परिसरातील विविध पंथीय चर्चतर्फे धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

ख्रिसमसच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवडकर सज्ज झाले असून, रविवारी (ता. २५, डिसेंबर) ख्रिसमसचा जल्लोष होणार आहे. यानिमित्त शहरातील सर्व ख्रिस्ती बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सांताक्लॉजची टोपी, ड्रेस घेण्यासाठी होणारी गर्दी, ताला-सुरात विविध गाणी सादर करून ख्रिस्तजन्माच्या दिल्या जाणाऱ्या शुभेच्छा, प्रभू येशू ख्रिस्त जन्मानिमित्तआयोजित करण्यात येणारे विविध कार्यक्रम, असे चित्र सध्या शहरात पाहण्यास मिळत आहे. ख्रिसमसनिमित्त शहरातील सर्व चर्चवर विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. याशिवाय चर्च आणि घरामध्ये आकर्षक सजावट करण्याचे कामही ख्रिस्तबांधवांचे सुरू आहे.

गुरुवारी ख्रिस्त जन्मोत्सव ः
फुल गॉस्पल ॲण्ड आउटरीच मिनिस्ट्रिच पिंपरी आणि अल्फा ओमेगा महासंघ यांच्यावतीने १५ डिसेंबर रोजी पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिरात सायंकाळी ५ वाजता ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करणार आहेत. पास्‍टर मनोज तेलोरे मार्गदर्शन करणार आहेत. स्तुती आराधना, प्रभावी संदेश आणि नृत्याचे सादरीकरण करण्यात येईल.

शनिवारी ‘योसेफ’ नाटक ः
फेथ ग्रुपच्यावतीने नाताळनिमित्त बायबलवर आधारित मोफत एक संगीतमय ‘योसेफ’ इंग्लिश नाटक सादर करण्यात येणार आहे. शनिवारी (ता.१७) पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिरात सायंकाळी ६ वाजता नाटकास सुरवात होईल. पौराणिक असे भव्य नाटक असणार आहे, अशी माहिती ग्रुपचे सदस्य संजय खटाणे यांनी दिली.

चर्चमध्ये गीतांसह विविध कार्यक्रम ः
- दि युनायटेड चर्च ऑफ ख्राईस्ट, पिंपरीच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. २३ तारखेपर्यंत कॅरल मार्च होणार आहे. रविवारी (१८) उपासनेनंतर विविध स्पर्धा होतील.
- संडेस्कुलच्या मुलांचा कार्यक्रम, बक्षीस व खाऊ वाटप. शनिवारी (ता. २४) रेव्हरंड सुधीर गायकवाड यांच्या उपस्थितीत प्रभुभोजन विधी वॉच वाईट सर्विस होईल. ख्रिस्त जन्मदिनाची विशेष उपासना रेव्हरंड सुधीर पारकर करतील.
- नागरिकांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. २६) अप्पूघर याठिकाणी ख्रिसमस स्नेहमिलन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. शनिवारी (ता. ३१)कँडल नाईट सर्विस होईल. अशा प्रकारे वाद्यवृंदातर्फे ख्रिस्ती धार्मिक गीतांचा कार्यक्रम होणार आहे.


‘‘दोन वर्षानंतर ख्रिसमस साजरा होत आहे. त्यासाठी मोठे नियोजन केले आहे. कोरोनामुळे लोकांना शुभेच्‍छा देता आल्या नाहीत. यावर्षी विभागवार नाताळ गाण्यातून ख्रिस्ती आणि अख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देणार आहोत.’’
- अमृत फन्सेका, फादर दि ऍफ्लीकेटेड कन्सोलर अवरलेडी चर्च, पिंपरी

़़़़‘‘यावर्षी ख्रिस्त जन्मदिवसाचा मोठा सोहळा चर्चमध्ये साजरा करणार आहोत. १२ डिसेंबरपासून धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. त्याबरोबरच सामाजिक उपक्रम घेणार आहोत. ’’
- सुधीर पारकर, रेव्हरंड -प्रेसबिटर इनचार्ज दि युनायटेड चर्च ऑफ ख्राईस्ट, कामगार नगर