सहाय्यक प्रशासन अधिकारी पद नियुक्तीवर आक्षेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहाय्यक प्रशासन अधिकारी पद नियुक्तीवर आक्षेप
सहाय्यक प्रशासन अधिकारी पद नियुक्तीवर आक्षेप

सहाय्यक प्रशासन अधिकारी पद नियुक्तीवर आक्षेप

sakal_logo
By

पिंपरी, ता.१४ ः शिक्षण विभागाच्या सहाय्यक प्रशासन अधिकारी या रिक्त पदावर उर्दू माध्यमाच्या पर्यवेक्षिका रजिया खान यांची प्रशासनाने नियुक्ती केली आहे. मात्र, या नियुक्तीला शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार पद भरण्याची त्यांनी मागणी केली आहे.

पराग मुंढे सेवानिवृत्त झाल्याने रिक्त पदासाठी दोन पर्यवेक्षिकांनी दावा केला होता. ज्येष्ठतेनुसार अनिता जोशी यांची नियुक्ती होणे क्रमप्राप्त होते, पण महापालिका प्रशासनाने खान यांना नियुक्तीचा आदेश दिला. त्यावर शिक्षक संघटनांबोरबरच जोशी यांनी आक्षेप घेतला आहे. प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे दाद मागितली आहे. शिवाय अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे.

दरम्यान, अनिता मुरलीधर जोशी शिक्षण विभागात १ जुलै १९८५ रोजी रुजू झाल्या आहेत. त्यांची पदोन्नतीने पदवीधर शिक्षकांमधून २३ मार्च २०१५ रोजी पर्यवेक्षकपदी नियुक्ती झाली आहे. तर पर्यवेक्षिका खान या १९८८ मध्ये रुजू झाल्या. शिक्षण विभागात मराठी माध्यम, हिंदी माध्यम व उर्दू माध्यमांच्या पद निर्मिती, पदांची भरती प्रक्रिया, पदोन्नती, सेवाज्येष्ठता याबाबी या त्या-त्या माध्यमांशी संबंधित व सिमीत आहेत. कोणत्याही माध्यमांच्या या बाबींचा इतर माध्यमांशी संबंध येत नाही. प्रत्येक माध्यमाच्या तंत्ररीत्या मुख्याध्यापक वा पर्यवेक्षक पदाच्या पदोन्नती होत असतात.

त्या दरम्यान, उर्दू माध्यमाच्या खान यांना ३ जुलै २०१२ रोजी केवळ उर्दू माध्यमाच्या शिक्षिकेमधून ज्येष्ठतेचा विचार करून रिक्त जागेवर पर्यवेक्षकपदी पदोन्नती देण्यात आली. खान यांना सहाय्यक प्रशासन अधिकारी पदाचा नियुक्ती आदेश देताना त्यां ‘क’ पदाच्या सेवाजेष्ठतेचा विचार केला गेल्याचे सकृतदर्शनी दिसून येते. या तांत्रिक बाबींवर शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला आहे.

कोट
‘‘उर्दू माध्यमाच्या रजिया खान यांच्या केवळ उर्दू माध्यमाच्या ज्येष्ठतेचा विचार करून रिक्त जागेवर पर्यवेक्षक पदी पदोन्नती देण्यात आली आहे. ही बाब अन्यायकारक आहे. पदोन्नतीने सहाय्यक प्रशासन अधिकारी पदाच्या जागेवर माझ्यावर अन्याय झाला आहे.’’
-अनिता जोशी, पर्यवेक्षिका

कोट
‘‘पर्यवेक्षक पदाच्या सेवाज्येष्ठतेनुसार मला पदोन्नती मिळाली आहे. मला २०१२मध्ये शिक्षकांमधून पर्यवेक्षक झाले आही.’’
-रजिया खान, सहाय्यक प्रशासन अधिकारी

कोट
‘‘ मराठी शाळांवर उर्दू शिक्षक शिकवत नाही. उर्दू वर्गांना मराठी शिक्षक नको असल्याचे पत्र काही संघटनांनी दिले आहेत, मग अशा परिस्थित सेवाज्येष्ठता डावलून उर्दू माध्यमाच्या पर्यवेक्षिका खान यांना कशी काय दिली आहे. त्यावर आमचा आक्षेप आहे.’’
-विजय कुंजीर, राज्यध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघटना

कोट
‘‘महापालिकेच्या पदोन्नती कमिटीच्या बैठकीत खान यांच्या पदाला मान्यता मिळाली आहे. त्यानुसार त्यांची नियुक्ती केली आहे.’’
-संदीप खोत, उपायुक्त, शिक्षण विभाग