Wed, Feb 1, 2023

स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे
यांची जयंती उत्साहात साजरी
स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती उत्साहात साजरी
Published on : 15 December 2022, 8:55 am
पिंपरी, ता. १४ ः स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी २५ हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले
याप्रसंगी माजी खासदार अमर साबळे यांनी शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी निगडीत शंभरहून अधिक अंध लोकांना अन्नधान्य, फळ, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. आमदार उमा खापरे, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे, अश्विनी बोबडे, भीमा बोबडे, माऊली थोरात, कमल घोलप, चंद्रकांत नखाते, नगरसेवक गोपाळ मळेकर, बाबा त्रिभुवन, सचिन सानप, राजू दुर्गे, माजी महापौर माई ढोरे उपस्थित होते. यावेळी यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.