
दोन रानमांजरीच्या पिल्लांना जीवदान
तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. १५ : गोडुंब्रे (मावळ) येथील रहिवासींना शेतात (ता.१४) रोजी रानमांजराची दोन पिल्लं आढळून आली त्यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेस माहिती दिली. वेळ न घालवता वनविभाग व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य विनय सावंत, निनाद काकडे, जिगर सोलंकी, रोहित पवार यांनी पिल्लांना रेस्क्यू करून तळेगाव येथील डॉ. धडके यांच्याकडे नेले प्राथमिक उपचार केले. त्यानंतर पिल्लं एकदम व्यवस्थित असल्याची माहिती वडगाव वनपरीक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांना दिली. त्यांच्या निरीक्षणाखाली पिलांना आई सोबत रियुनियन करण्यासाठी ठेवली असता मध्यरात्री आई पिल्लांना घेऊन गेली. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे, अध्यक्ष अनिल आंद्रे, गणेश निसाळ यांनी लोकांना कोणतेही वन्यप्राणी आढळल्यास लांब उभे रहावे आणि गरज असल्यास वनविभागाला संपर्क करावा त्यांचा टोल फ्री नं. १९२६ आहे. तसेच कोणते ही वन्य प्राणी पाळू नये किंवा मारू नयेत असे आव्हान केले.