इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुण बोऱ्हाडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या
अध्यक्षपदी अरुण बोऱ्हाडे
इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुण बोऱ्हाडे

इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुण बोऱ्हाडे

sakal_logo
By

पिंपरी, ता. १६ ः साहित्य, कला व मराठी भाषा संवर्धनासाठी देहू-आळंदी परिसरातील साहित्यप्रेमी व ग्रामस्थांनी इंद्रायणी साहित्य परिषदेची स्थापना केली. त्यांच्यातर्फे शनिवारी (ता. २४) मोशी येथे इंद्रायणी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. त्याच्या अध्यक्षपदी कामगार नेते तथा ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांची निवड केली आहे, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर यांनी दिली. गुरुवारी परिषदेची चऱ्होलीत बैठक झाली. त्यात ज्येष्ठ साहित्यिक दादाभाऊ गावडे यांनी अध्यक्षपदाचा प्रस्ताव मांडला. त्यास लोकसाहित्याचे अभ्यासक सोपान खुडे यांनी अनुमोदन दिले. संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते होईल. ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या उपस्थितीत समारोप होईल. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी संतोष बारणे यांची निवड झाली आहे.
--