Thur, Feb 2, 2023

रस्त्याचे निकृष्ठ काम;
अभियंत्यांची चौकशी
रस्त्याचे निकृष्ठ काम; अभियंत्यांची चौकशी
Published on : 16 December 2022, 11:40 am
पिंपरी, ता. १६ ः पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालय ते नर्मदा गार्डन रस्त्याच्या निकृष्ठ काम झाले होते. त्याबाबत एकसदस्यीय समितीतर्फे चौकशी समिती नियुक्त केली होती. त्यांच्या अहवालानुसार चार अभियंत्यांची विभागीय चौकशी करण्याचा आदेश महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी दिला. कामात दिरंगाई केल्याचा ठपका अभियंत्यांवर ठेवण्यात आला आहे. त्यामध्ये प्रभारी कार्यकारी अभियंता अनिल राऊत, उपअभियंता विजयसिंह भोसले, कनिष्ठ अभियंता सचिन सानप व मच्छिंद्र मगर यांचा समावेश आहे.