पिंपरीत जनगर्जना मोर्चाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरीत जनगर्जना मोर्चाचे आयोजन
पिंपरीत जनगर्जना मोर्चाचे आयोजन

पिंपरीत जनगर्जना मोर्चाचे आयोजन

sakal_logo
By

पिंपरी, ता. १६ ः गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी सकल हिंदू समाजातर्फे पिंपरी चिंचवड शहरात विराट हिंदू जनगर्जना मोर्चाचे आयोजन केले आहे. येत्या रविवारी (ता.१८) आयोजन करण्यात आले आहे. या विराट हिंदू जनगर्जना मोर्चाची सुरवात सकाळी नऊ वाजता चिंचवड स्टेशन येथील क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारकापासून होणार आहे. मोर्चा महामार्गाने मार्गस्थ होत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे मोर्चाचा समारोप होणार आहे. या मोर्चात पिंपरी चिंचवड शहरासह आळंदी, देहू नगरपालिका तसेच हिंजवडी मधून सकल हिंदू समाजातील अनेक संप्रदाय, संस्था, संघटना मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या विराट मोर्चात पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक हिंदूंनी सह कुटुंबांनी सहभागी होण्याचे आवाहन सकल हिंदू समाज समन्वय समितीतर्फे करण्यात आले आहे.