‘समाजविकास’कडून वॉर्ड चाइल्ड संरक्षण समितीचा कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘समाजविकास’कडून वॉर्ड चाइल्ड 
संरक्षण समितीचा कार्यक्रम
‘समाजविकास’कडून वॉर्ड चाइल्ड संरक्षण समितीचा कार्यक्रम

‘समाजविकास’कडून वॉर्ड चाइल्ड संरक्षण समितीचा कार्यक्रम

sakal_logo
By

पिंपरी, ता. १८ : महापालिकेच्या समाजविकास विभागाच्यावतीने वॉर्ड चाइल्ड संरक्षण समितीचा कार्यक्रम झाला. यामध्ये बाळ संरक्षण समिती व महिला सुरक्षा समितीची स्थापना करण्याविषयीची बैठक पार पडली. विविध शाळांमधील चिमुकल्यांची उपस्थिती होती.

अर्पण संस्थेद्वारे आयोजित कार्यक्रमात महिला व मुलांच्या सुरक्षिततेवर विषय केंद्रित करण्यात आला होता. यावेळी उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, सुहास बहादरपुरे, पुणे जिल्हा फेडरेशनचे चेअरमन सुहास पटवर्धन, बाळ संरक्षण अधिकारी रूपाली साळुंखे, अर्पणच्या संचालिका तेजस्विनी ढोमसे सवाई, स्वनाथ फाउंडेशनच्या संस्थापिका श्रेया भारतीय उपस्थित होते.

इंदलकर यांनी जानेवारी महिन्यात समिती स्थापन करण्याची हमी दिली. सुहास पटवर्धन यांनी तंटामुक्त सोसायटी व महिला आणि मुलांना सुरक्षित वातावरण हवे याविषयी सांगितले. ढोमसे यांनी मुलांच्याविषयी जनजागृती विषयक माहिती दिली. रूपाली यांनी समिती स्थापना व कार्य याविषयी माहिती दिली.