गॅलेक्सी शाळेत विद्यार्थ्यांनी घेतला एरोमॉडेलिंग शोचा आनंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गॅलेक्सी शाळेत विद्यार्थ्यांनी घेतला एरोमॉडेलिंग शोचा आनंद
गॅलेक्सी शाळेत विद्यार्थ्यांनी घेतला एरोमॉडेलिंग शोचा आनंद

गॅलेक्सी शाळेत विद्यार्थ्यांनी घेतला एरोमॉडेलिंग शोचा आनंद

sakal_logo
By

पिंपरी,ता.१८ ः मोशी येथील श्रीमती सुभद्रा फाउंडेशनच्या गॅलेक्सी किड्स स्कूलमधील विद्यार्थ्यांनी ‘एरोमॉडेलिंग शो’चा आनंद घेतला. वार्षिक क्रीडा दिन व विमान शोध दिनानिमित्त निमित्त शाळेत याचे आयोजन केले होते. यात रेडिओ कंट्रोल विमानांची आकर्षक प्रात्यक्षिके, उडता मासा, उडती तबकडी व बॅनर टोईंग करणारी विमाने, भारतीय वायू सेनेतील तेजस व सुखोई ३० यांच्या प्रतिकृतीच्या थरारक कसरती पहायल्या मिळाल्या.

इंद्रायणी नगरमधील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात क्रीडा महोत्सव झाला. पॅरा कमांडो रघुनाथ सावंत, मेजर अशोक जाधव, ॲग्रो आयडियल कैलास जाधव प्रमुख पाहुणे होते. त्यांनी मुलांना सैनिकी जीवन, विमान व सैन्यातील विविध क्षेत्राबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका माधवी जनार्धनन, सैनिक युवा फोर्सचे संचालक रामदास मदने, सैनिक अकादमीचे मुख्य प्रशिक्षक मोहनीष बारिया उपस्थित होते. यावेळी मर्दानी खेळ, मानवी मनोरे, धनुर्विद्या, नेमबाजी अशा अनेक क्रीडा प्रकाराचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.
--
कोट
पिंपरी-चिंचवड शहर व मोशी परिसरात एखाद्या शाळेमार्फत पहिल्यांदाच अशा ‘एरोमॉडलिंग शो’चे आयोजन केले. याला विद्यार्थी व पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात सैनिकी कार्यपद्धती माहिती व्हावी, यासाठी याचे आयोजन केले होते.
-माधवी जनार्धनन, मुख्याध्यापिका