कासारवाडी आयटीआयला ‘सॅंडविक’कडून यंत्र भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासारवाडी आयटीआयला
‘सॅंडविक’कडून यंत्र भेट
कासारवाडी आयटीआयला ‘सॅंडविक’कडून यंत्र भेट

कासारवाडी आयटीआयला ‘सॅंडविक’कडून यंत्र भेट

sakal_logo
By

पिंपरी, ता. १९ ः सँडविक कोरोमंट कंपनीच्या सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) अंतर्गत महापालिकेच्या कासारवाडी येथील मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला मशिनरी सेटअप देण्यात आले. यामध्ये सँडविकने इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल ट्रेडसाठी सहा अद्ययावत इलेक्ट्रॉनिक्स वर्क स्टेशन्सचा समावेश होता. विद्यार्थ्यांसाठी मेकॅट्रॉनिक्स आणि फॅशन डिझाईन टेक्नॉलॉजीबाबत प्रशिक्षण दिले. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्या हस्ते विद्यार्थिनींना प्रमाणपत्र वितरित केले. मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सँडविक कोरोमंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण आचार्य, स्किल सोनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसन्नजित कुंडू, महापालिका सीएसआर कक्षाचे सल्लागार विजय वावरे, सँडविकच्या प्रतिनिधी रोशनी आचार्य, कासारवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या गटनिदेशक शर्मिला काराबळे, निदेशक पूनम गलांडे, बबिता गावंडे, सोनाली नीलवर्ण, वंदना चिंचवडे, मनसरा कुमावनी, हेमाली कोंडे, सिद्धार्थ कांबळे, जया जाधव आदी उपस्थित होते. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. योगेश बाविस्कर यांनी आभार मानले.